स्पोर्ट्स डेस्क- भारतीय महिला क्रिकेट टीम वुमन्स वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये पोहचल्या आहेत. गुरुवारी खेळल्या गेलेल्या दुस-या सेमीफायनल मॅचमध्ये टीम इंडियाने 6 वेळच्या चॅम्पियन ऑस्ट्रेलियाला 36 धावांनी हरविले. 44 वर्षाच्या वुमन्स वर्ल्ड कप इतिहासात भारत दुस-यांदा फायनलमध्ये गेला आहे. सेमीफायनलमध्ये ऑस्ट्रेलियाला हारवताच सोशल मीडियात वुमन टीमची जोरदार कौतूक होत आहे. खासकरून मॅचमध्ये नाबाद 171 धावा करत मॅन ऑफ द मॅच ठरलेल्या हरमनप्रीत कौरचे क्रिकेट फॅन्ससह दिग्गजांनीही जोरदार कौतीक केले आहे. हरमनप्रीतने केली ही कमाल...
- भारत आणि ऑस्ट्रेलिया संघातील होणा-या दुस-या सेमीफायनल मॅचमध्ये पावसाच्या व्यत्ययामुळे सामना प्रत्येकी ४२ षटकांचा ठेवण्यात आला.
- भारताने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण टीम इंडियाची सुरुवात खराब झाली.
- सलामीवीर स्मृती मानधना (6) आणि पूनम राऊत (14) झटपट बाद झाल्या.
- तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेल्या हरमनप्रीत कौरने संघाचा डाव सावरला. यादरम्यान तिला कर्णधार मितालीची महत्त्वाची साथ मिळाली. या दोघींनी तिसऱ्या विकेटसाठी 67 धावांची भागीदारी रचली आणि संघाच्या धावसंख्येला गती दिली.
- दरम्यान, कर्णधार मितालीने सामन्यात ६१ चेंडूंत ३६ धावांची खेळी करून तंबू गाठला. मात्र फॉर्मात असलेल्या हरमनप्रीत कौरने मैदानावरची आपली झंझावाती खेळी शेवटपर्यंत कायम ठेवली.
- हरमीतने 115 चेंडूत 20 चौकार आणि 7 षटकारांसह नाबाद 171धावांची खेळी केली. या वेळी तिला दीप्तीने मोलाची साथ दिली. - त्यामुळे या दोघींची चौथ्या विकेटसाठी 137 धावांची मोठी भागीदारी केली. त्यामुळे टीमच्या धावसंख्येला गती मिळाली.
- हरमीतच्या विश्वविक्रमी खेळीमुळे भारताने निर्धारित 42 षटकात 4 बाद 281 धावांचा डोंगर उभा केला. प्रत्युत्तरादाखल कांगारूंची टीम 40.1 षटकात सर्वबाद 245 धावांच करू शकली.
पुढे स्लाईडद्वारे वाचा, ऑस्ट्रेलियाविरूद्ध ऐतिहासिक खेळी केल्यानंतर दिग्गजांनी हरमीतच्या कशा शब्दात केले कौतूक....