आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तिस-या वनडेदरम्यान श्रीलंकन प्रेक्षकांचा स्टेडियमध्ये राडा, सोशल मिडियात उडाली खिल्ली

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्पोर्ट्स डेस्क- श्रीलंका टीम वनडे मालिकेतील तिस-या मॅचमध्येही भारताकडून पराभूत झाली. यजमान टीमने ही मॅच 6 विकेटने गमावली. यासोबत त्यांच्या हातून वनडे मालिकाही निसटली. या तिस-या सामन्यात श्रीलंकेचा पराभव होणार असे दिसताच लंकन फॅन्स भडकले व त्यांनी आपला राग व्यक्त करायला सुरुवात केली. भारताला विजयासाठी 8 धावांची गरज असताना श्रीलंकेच्या स्टेडियममधील प्रेक्षकांनी बाटल्या व इतर वस्तू खेळाडूंकडे फेकणे सुरु केले. ज्यानंतर सामना थांबवण्यात आला. भारताला विजयी घोषित करण्यात आले मात्र नंतर वातावरण शांत केल्यानंतर 15 मिनिटांनी सामना सुरु केला. भारताने मग पुढच्या 7 चेंडूत उर्वरित 8 धावा काढत सामना जिंकला. यानंतर इंडियन फॅन्सने सोशल मीडियात त्यांची खूप खिल्ली उडविली. अशी झाली मॅच....
 
- श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 50 षटकात 9 बाद 217 धावा केल्या होत्या. लाहिरू थिरिमानेने 80, चंडीमलने 36 तर सिरिवर्धनेने 29 धावांचे योगदान दिले.
- भारताच्या जसप्रीत बुमराहने 5 विकेट काढल्या. त्याला मॅन ऑफ द मॅच घोषित करण्यात आले.
- यानंतर भारताने हे लक्ष्य 45.1 षटकात 4 गड्याच्या मोबदल्यात पार केले. भारताकडून रोहित शर्माने नाबाद 124 धावा काढल्या  तर धोनी 67 धावांवर नाबाद राहिला.
 
पुढे स्लाईडद्वारे पाहा, मॅचनंतर आलेल्या कमेंट्स
बातम्या आणखी आहेत...