आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नंबर वनवर टिकणार का टीम इंडिया? अशी आहे Test रँकिंग...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्पोर्ट्स डेस्क - श्रीलंका विरोधात 3 सामन्यांच्या टेस्ट सिरीजची पहिली मॅच गुरुवारी सुरू होत आहे. नुकतेच झालेल्या श्रीलंका दौऱ्यात भारताने श्रीलंकेला टेस्ट, वनडे आणि टी-20 अशा सर्वच फॉरमॅटमध्ये 9-0 ने पराभूत केले. आता श्रीलंकेचा संघ भारत दौऱ्यावर असताना भारताचे ध्येय टेस्ट रँकिंगमध्ये नंबर एकवर राहणे आहे. भारतीय संघाचा उप-कर्णधार अजिंक्य रहाणेने सांगितल्याप्रमाणे, श्रीलंकेत झालेल्या सिरीज आणि आता भारतात होणाऱ्या सिरीजमध्ये खूप फरक आहे. भारतीय संघाने यापूर्वी 9-0 ने विजय मिळवला तरीही श्रीलंकेला हल्क्याने घेता येणार नाही. कुठल्याही परिस्थितीत टेस्ट रँकिंगमध्ये नंबर एकला टिकून राहणे हेच आपले ध्येय असल्याचे अजिंक्यने स्पष्ट केले आहे. 

सध्या आयसीसीच्या टेस्ट रँकिंगमध्ये 4,493 अंक आणि 125 रेटिंग पॉइट्ससह भारत नंबर एकच्या पोझीशनला आहे. तर 3,658 अंक आणि 94 रेटिंग पॉइट्ससह श्रीलंका क्रमवारीत सहावा संघ आहे. अशात भारताकडे नंबर एकला टिकून राहण्याचे आव्हान आहे असे अजिंक्य रहाणेने मान्य केले आहे. 

पुढील स्लाइड्सवर पाहा, आयसीसी टेस्ट रँकिंगमध्ये टॉप-10 संघांची अंकांसह परिपूर्ण यादी...
बातम्या आणखी आहेत...