आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिला WC: कांगारूंना लोळवत टीम इंडिया फायनलमध्ये, ट्विटरवर आल्या या कमेंट्स

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्पोर्ट्स डेस्क- भारतीय महिला क्रिकेट टीम वुमन्स वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये पोहचल्या आहेत. गुरुवारी खेळल्या गेलेल्या दुस-या सेमीफायनल मॅचमध्ये टीम इंडियाने 6 वेळच्या चॅम्पियन ऑस्ट्रेलियाला 36 धावांनी हरविले. 44 वर्षाच्या वुमन्स वर्ल्ड कप इतिहासात भारत दुस-यांदा फायनलमध्ये गेला आहे. सेमीफायनलमध्ये ऑस्ट्रेलियाला हारवताच सोशल मीडियात वुमन टीमची जोरदार कौतूक होत आहे. खासकरून मॅचमध्ये नाबाद 171 धावा करणा-या हरमनप्रीत कौरवरून क्रिकेट फॅन्स खूप ट्विट्स करत आहेत. असा राहिला मॅचचा रोमांच...
 
- भारत आणि ऑस्ट्रेलिया संघातील होणा-या दुस-या सेमीफायनल मॅचमध्ये पावसाच्या व्यत्ययामुळे सामना प्रत्येकी ४२ षटकांचा ठेवण्यात आला. 
- भारताने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण टीम इंडियाची सुरुवात खराब झाली.
- सलामीवीर स्मृती मानधना (6) आणि पूनम राऊत (14) झटपट बाद झाल्या. 
- तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेल्या हरमनप्रीत कौरने संघाचा डाव सावरला. यादरम्यान तिला कर्णधार मितालीची महत्त्वाची साथ मिळाली. या दोघींनी तिसऱ्या विकेटसाठी 67 धावांची भागीदारी रचली आणि संघाच्या धावसंख्येला गती दिली. 
- दरम्यान, कर्णधार मितालीने सामन्यात ६१ चेंडूंत ३६ धावांची खेळी करून तंबू गाठला. मात्र फॉर्मात असलेल्या हरमनप्रीत कौरने मैदानावरची आपली झंझावाती खेळी शेवटपर्यंत कायम ठेवली.
- हरमीतने 115 चेंडूत 20 चौकार आणि 7 षटकारांसह नाबाद 171धावांची खेळी केली. या वेळी तिला दीप्तीने मोलाची साथ दिली. - त्यामुळे या दोघींची चौथ्या विकेटसाठी 137 धावांची मोठी भागीदारी केली. त्यामुळे टीमच्या धावसंख्येला गती मिळाली. दीप्तीने ३५ चेंडूंत २५ धावांचे योगदान दिले. त्यानंतर वेदा कृष्णमूर्तीनेही (नाबाद 16) शानदार साथ दिली.
- भारताने निर्धारित 42 षटकात 4 बाद 281 धावांचा डोंगर उभा केला. प्रत्युत्तरादाखल कांगारूंची टीम 40.1 षटकात सर्वबाद 245 धावांच करू शकली.
- ऑस्ट्रेलियाकडून व्हॅलिनी (75) आणि ब्लॅकवेल (90 ) यांनी जोरदार प्रयत्न केला पण त्यांचे प्रयत्न अपुरे ठरले. अखेर भारताने 36 धावांनी विजय खेचत दिमाखात अंतिम फेरीत प्रवेश केला. आता रविवारी टीम इंडिया इंग्लंडविरोधात विजेतेपदासाठी लढेल.
 
पुढे स्लाईडद्वारे पाहा, भारताने कांगारूंना पराभूत केल्यानंतर सोशल मिडियात आलेल्या जबरदस्त कमेंट्स...
बातम्या आणखी आहेत...