आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हे 6 क्रिकेटपटू ठरले बांगलादेशवर भारी, भारताची चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये धडक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्पोर्टस डेस्क - ICC चॅम्पियन्स ट्रॉफी 2017च्या दुसऱ्या सेमीफायनलमध्ये भारताने गुरुवारी बांगलादेशचा 9 विकेट्सनी पराभव केला आणि फायनलमध्ये जागा बनवली. या सामन्यात टीम इंडियाचे खेळाडू प्रत्येक बाबतीत बांगलादेशी टीमवर वरचढ ठरले. अगोदर गोलंदाजांनी बांगलादेशला 264/7 धावांवर रोखले आणि नंतर फलंदाजांनी जबरदस्त परफॉर्म करत केवळ 1 विकेट गमावून बांगलादेशला चीत केले. यादरम्यान भारताच्या 6 खेळाडूंचा शानदार खेळ बांगलादेशी टीमच्या पराभवास कारणीभूत ठरला.
-आता टुर्नामेंटच्या फायनलमध्ये रविवार, 18 जून रोजी भारताचा महामुकाबला पाकिस्तानशी होणार आहे. 
 
धोनीचा सल्ला ठरला सामन्यासाठी टर्निंग पॉइंट...
- सामन्यात बांगलादेशच्या तमीम इक्बाल (70) आणि मुशफिकूर रहीम (61) यांच्या आऊट होणे सामन्याचा टर्निंग पॉइंट ठरला. सुरुवातीला दोन विकेट लवकर गेल्यानंतर या दोघांनी संघाला सावरले होते. हे दोघे वेगाने धावा काढत होते. यादरम्यान धोनीच्या सल्ल्यानुसार विराटने केदार जाधवला चेंडू सोपवला. आणि केदारनेही केवळ 25 धावांत या दोन्ही फलंदाजांना तंबूत पाठवले. दोघे बाद झाल्याने बांगलादेशी संघाला उतरती कळा लागली.
 
हेही जरूर वाचा...
 
पुढच्या स्लाइड्समध्ये पाहा कोणते 6 प्लेअर ठरले बांगलादेशी टीमवर भारी...
बातम्या आणखी आहेत...