आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या पाकिस्तानी क्रिकेटरने कजिनशी केला निकाह, अशी बदलली लाईफ

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्पोर्ट्स डेस्क- पाकिस्तानचा माजी स्टार क्रिकेटर सईद अन्वर याने नुकताच 50 वा वाढदिवस साजरा केला. पाकिस्तानमधील सर्वांत यशस्वी क्रिकेटर्समध्ये त्याची गणना केली जाते. खासगी आयुष्यात घटलेल्या एका घटनेनंतर त्याची लाईफ पूर्णपणे बदलली. क्रिकेटपासून लक्ष भरकटून धर्माकडे केंद्रीत झाले.
 
या घटनेनंतर अन्वरने सोडले क्रिकेट
- सईद अन्वरने कजिनशी निकाह केला. ती व्यवसायाने डॉक्टर आहे. मार्च १९९६ मध्ये दोघांनी निकाह केला.
- 2001 मध्ये प्रदिर्घ आजारानंतर त्याची मुलगी बिस्माह हिचा मृत्यू झाला. त्यानंतर तो प्रचंड खचला होता.
- या घटनेचा त्याच्यावर गंभीर परिणाम झाला. मुलीचा मृत्यू झाला तेव्हा तो टेस्ट मॅच खेळत होता. त्याने लगेच क्रिकेट सोडण्याचा निर्णय घेतला.
- त्यानंतर तो धार्मिक विचारांकडे झुकला. तब्लिगी जमात या संस्थेसाठी तो काम करु लागला. तो इस्लामचा उपदेशक झाला.
- पाकिस्तान क्रिकेट बोर्डने मन वळविल्यानंतर तो वनडे क्रिकेट खेळू लागला. पण त्याला आधीसारखे यश मिळत नव्हते.
- 15 ऑगस्ट 2003 रोजी त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला.
 
२००१ मध्ये खेळली अखेरची टेस्ट मॅच
-  ऑगस्ट २००१ मध्ये मुल्तान टेस्टमध्ये अन्वरने बांगलादेशविरुद्ध शतक झळकावले होते. हिच त्याच्या करिअरची अखेरची टेस्ट मॅच ठरली.
- या मॅचच्या वेळी त्याला मुलीच्या मृत्यूची बातमी समजली. त्यानंतर तो लगेच घरी परतला होता. त्याने टेस्ट क्रिकेट खेळणे सोडले.
 
कराचीत झाला जन्म
-  सईद अन्वरचा जन्म 6 सप्टेंबर 1968 रोजी पाकिस्तानमधील कराची शहरात झाला. 1973 मध्ये त्याचे कुटुंब कॅनडात शिफ्ट झाले.
- १९७७ मध्ये त्याचे कुटुंब पुन्हा पाकिस्तानमध्ये परतले. त्यानंतर त्याचे वडील सौदी अरेबियात नोकरीसाठी गेले. यावेळी  तो आजी-आजोबांसोबत पाकिस्तानमध्ये राहत होता.
- त्याने एनईडी युनिव्हर्सिटी ऑफ इंजिनिअरिंगमधून पदवी घेतली आहे. त्याला पदविका घेण्यासाठी अमेरिकेला जायचे होते. पण या दरम्यान त्याला पाकिस्तान क्रिकेट संघाकडून खेण्याची संधी मिळाली.
- अन्वरचे वडील बिझनेसमन होते. त्यांनी क्लब लेव्हलवर क्रिकेट खेळले होते. त्याचा भाऊ जावेद अन्वरने लाहोर टीमसाठी अंडर-१९ क्रिकेट खेळले आहे.
- मालिर जिमखाना या टिमकडून त्याने स्पिनर म्हणून सुरवात केली होती. बॅटिंगसाठी तो नवव्या क्रमांकावर यायचा.
 
पुढील स्लाईडवर वाचा, सईद अन्वरशी निगडित रोचक फॅक्ट्स...
बातम्या आणखी आहेत...