आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केकेआरपुढे किंग्ज इलेव्हन पंजाबचे आव्हान; प्लेऑफचे आव्हान कायम ठेवण्याचा पंजाबचा प्रयत्न

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मोहाली- इंडियन प्रीमियर लीगमध्ये मंगळवारी कोलकाता नाइट रायडर्ससमोर किंग्ज इलेव्हन पंजाब संघाचे आव्हान असेल. या सामन्यात विजय मिळवून प्लेऑफचे स्थान मजबूत करण्याचा केकेआरचा प्रयत्न असेल. दुसरीकडे कोलकात्याला हरवून प्लेऑफचे आव्हान कायम ठेवण्याच्या प्रयत्नात पंजाबचा संघ असेल. दोन्ही संघांत मंगळवारी मोहालीच्या मैदानावर झुंज रंगेल. या सामन्याच्या निमित्ताने केकेआरचा गौतम गंभीर आणि पंजाबचा ग्लेन मॅक्सवेल समोरासमोर असतील.   

मागच्या सामन्यात केकेअारने शानदार प्रदर्शन करून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला हरवले. गौतम गंभीरच्या नेतृत्वाखालील केकेआरच्या नावे सध्या १२ सामन्यांत ८ विजयासंह १६ गुण आहेत. या सत्रात केकेआर आयपीएलमधील मजबूत संघ म्हणून पुढे आहे. केकेआरची फलंदाजी आणि गोलंदाजी हे दोन्ही मजबूत असून, या दोन्हीत संघ संतुलित आहे. मागच्या सामन्यात आरसीबीविरुद्ध १५९ धावांचा पाठलाग करताना केकेआरचा कामचलाऊ फिरकीपटू सुनील नरेनने अवघ्या १५ चेंडूंत अर्धशतक ठोकून आयपीएलच्या सर्वात वेगवान अर्धशतकाचा इतिहास रचला होता.  क्रिस लिनसुद्धा तंदुरुस्त होऊन संघात परतला असून यामुळे केकेआरची ताकद वाढली आहे. दुसरीकडे पंजाबची टीमही लयीत आहे. मात्र, सातत्यपूर्ण कामगिरी करण्यात पंजाबचे खेळाडू अपयशी ठरले आहेत. या सामन्यात हाशिम आमला आणि डेव्हिड मिलरची अनुपस्थिती पंजाबला जाणवेल. हे दोन्ही आफ्रिकन खेळाडू मायदेशी परतले आहेत.  

दोन्ही संघ असे 
कोलकाता नाइट रायडर्स : गौतम गंभीर (कर्णधार), सुनील नरेन, क्रिस लिन, रॉबिन उथप्पा, सूर्यकुमार यादव, पीयूष चावला, युसूफ पठाण, ग्रँडहोम, कुल्टर नाईल, शेल्डन जॅक्सन, कुलदीप यादव, क्रिस वोक्स, मनीष पांडे.
  
किंग्ज इलेव्हन पंजाब : ग्लेन मॅक्सवेल (कर्णधार), मनन वोहरा, डॅरेन सॅमी, शॉन मार्श, ईशांत शर्मा, वृद्धिमान साहा, मार्टिन गुप्तिल, अरमान जाफर, करिरप्पा, वरुण अॅरोन, टी. नटराजन, अक्षर पटेल, मॅट हेनरी, मोहित शर्मा.
बातम्या आणखी आहेत...