आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • IPL 2017, Preview, DD Vs RPS: Pune Would Be Wary About Slipping Up Against Mercurial Delhi

IPL10: प्लेऑफमध्ये प्रवेश करण्यासाठी रायझिंग पुणे सुपरजाएंट मैदानात उतरणार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रायझिंग पुणे सुपरजायंटसमोर आज रात्री दिल्ली डेअरडेव्हिल्सचे आव्हान असेल.  या लढतीच्या निमित्ताने स्टीव्हन स्मिथ आणि झहीर खान समोरासमोर असतील. - Divya Marathi
रायझिंग पुणे सुपरजायंटसमोर आज रात्री दिल्ली डेअरडेव्हिल्सचे आव्हान असेल. या लढतीच्या निमित्ताने स्टीव्हन स्मिथ आणि झहीर खान समोरासमोर असतील.
स्पोर्ट्स डेस्क- इंडियन प्रीमियर लीग-१० मध्ये एकेका सामन्यात विजय मिळवून गुणतालिकेत आपले स्थान मजबूत करणाऱ्या रायझिंग पुणे सुपरजायंटसमोर आज रात्री दिल्ली डेअरडेव्हिल्सचे आव्हान असेल. दिल्लीचा कर्णधार झहीर खानने नाणेफिक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. या सामन्यात विजय मिळवून प्लेऑफमध्ये प्रवेश करण्याचे प्रयत्न रायझिंग पुणे करेल. या लढतीच्या निमित्ताने दोन्ही संघांचे कर्णधार स्टीव्हन स्मिथ आणि झहीर खान समोरासमोर असतील. पुण्याचा युवा राहुल त्रिपाठी तर दिल्लीचा युवा फलंदाज ऋषभ पंत यांच्या खेळाकडे सर्वांचे लक्ष असेल.
 
पुणे सुपरजायंटने स्पर्धेत गचाळ सुरुवातीनंतर दमदार पुनरागमन केले. पुण्याने मागच्या आठ सामन्यांपैकी मध्ये विजय मिळवून विरोधी संघांना चकित केले. स्पर्धेत आतापर्यंत मुंबई, कोलकाता आणि पुण्याचे प्रदर्शन जबरदस्त राहिले आहे. शुक्रवारच्या सामन्यातसुद्धा दिल्लीला धक्का देण्याचा पुण्याचा प्रयत्न असेल. दुसरीकडे दिल्ली डेअरडेव्हिल्स संघ आधीच प्लेऑफमधून बाहेर झाला आहे. या सामन्यात विजय किंवा पराभवाने दिल्लीला फारसा फरक पडणार नाही. मात्र, दिल्ली या सामन्यात विजय मिळवून पुण्याचे गणित बिघडवू शकते. 
 
मागच्या सामन्यात पुण्याच्या गोलंदाजांनी सनरायझर्स हैदराबादला १४८ धावांत रोखून शानदार विजय मिळवून दिला. मागच्या लढतीत पुण्याचा डावखुरा वेगवान गोलंदाज जयदेव उनादकटने हॅट्टिकसह ५ विकेट घेतल्या होत्या. उनादकटमुळे पुण्याने हैदराबादला हरवले होते. मात्र, दिल्लीविरुद्ध विजय मिळवायचा असेल तर पुण्याच्या फलंदाजांनाही दमदार प्रदर्शन करून मोठा स्कोअर करावा लागेल. पुण्याकडून आतापर्यंत लेगस्पिनर इम्रान ताहिरने १८ आणि जयदेवने १७ गडी बाद केले आहेत. 
 
दिल्लीची मदार युवा खेळाडूंवर- 
 
दुसरीकडे दिल्लीचा संघ युवा खेळाडूंवर अवलंबून आहे. मागच्या लढतीत गुजरातविरुद्ध सर्व दिग्गज बाद झाल्यानंतरही मुंबईचा फलंदाज श्रेयस अय्यरने तुफानी खेळी करून ९६ धावा ठोकल्या आणि दिल्लीला विजय मिळवून दिला. दिल्लीकडे अनुभवी खेळाडूंची कमी असली तरीही दिल्लीचे युवा खेळाडू रायझिंग पुण्याला धक्का देण्यात सक्षम आहेत.

आमचे उर्वरित दोन सामनेसुद्धा जिंकायचेत- झहीर 
 
इंडियन प्रीमियर लीगमध्ये उरलेल्या दोन सामन्यांतसुद्धा आम्हाला विजय मिळवायचा आहे, असे दिल्ली डेअरडेव्हिल्सचा कर्णधार झहीर खानने म्हटले आहे. सुमार प्रदर्शनामुळे दिल्ली डेअरडेव्हिल्सची टीम प्लेऑफच्या शर्यतीतून आधीच बाहेर झाली आहे. 
 
असे आहेत दोन्ही संघ-
  
रायझिंग पुणे सुपरजायंट : स्टीव्हन स्मिथ (कर्णधार), अजिंक्य रहाणे, मयंक अग्रवाल, राहुल त्रिपाठी, महेंद्रसिंग धोनी, बेन स्टोक्स, डॅन क्रिस्टियन, लोकी फर्ग्युसन, इम्रान ताहिर, जयदेव उनादकट, शार्दूल ठाकूर, ईश्वर पांडे, अॅडम झम्पा. 
 
दिल्ली डेअर डेव्हिल्स : झहीर खान (कर्णधार), संजू सॅमसन, करुण नायर, श्रेयस अय्यर, कोरी अँडरसन, अंकित बावणे, पॅट कमिन्स, अमित मिश्रा, मो. शमी, जयंत यादव, कार्लोस ब्रेथवेट, मार्लोन सॅम्युअल्स, शादाब नदीम, आदित्य तारे. 
बातम्या आणखी आहेत...