आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Match Analysis Why Team India Lost To Pakistan In Champions Trophy Final

बुमराहच्या नो-बॉलने घात केला, टीम इंडियाच्या पराभवाची ही आहेत 5 कारणे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्पोर्टस डेस्क - फायनलमध्ये टीम इंडियाचा 180 धावांनी पराभव करून पहिल्यांदाच पाकिस्तानने चॅम्पियन्स ट्रॉफीवर कब्जा केला आहे. टॉस जिंकून भारतीय कर्णधार विराट कोहलीने पहिल्यांदा गोलंदाजीचा निर्णय घेतला. पाकिस्तानने 50 षटकांत 4 विकेट गमावून 338 धावा केल्या. चौथ्या ओव्हरमध्ये जसप्रीत बुमराहच्या बॉलवर फखर जमानचा झेल पकडण्यात आला, परंतु तो नोबॉल ठरला. या कारणामुळे पाकिस्तानने इतकी मोठी धावसंख्या उभारली. जमानने यानंतर शतक ठोकले. मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना टीम इंडिया 30.3 ओव्हरमध्येच 158 धावांवर ऑलआऊट झाली. मोहम्मद आमिर आणि हसन अलीने प्रत्येकी 3 विकेट घेतल्या.
 
3 धावांच्या वैयक्तिक स्कोअरवर मिळाले जीवदान, नंतर फखर केले शतक
-जसप्रीत बुमराहच्या एका चेंडूवर झालेली घोडचूक टीम इंडियाला महागात पडली. सामन्याच्या चौथ्या ओव्हरच्या दुसऱ्या चेंडूवर बुमराहने फखर जमानची विकेट घेतली होती, परंतु तो नोबॉल निघाला. जर बुमराहने ही चूक केली नसती तर फखरची विकेट गेली असती आणि पाकिस्तानवर दबाव बनल असता. फखर तेव्हा फक्त 3 धावांवर खेळत होता. या जीवदानाचा फायदा उठवत त्याने आपल्या करिअरमधील पहिले शतक साजरे केले. फखर - अझहर अलीने पहिल्या विकेटसाठी 128 धावांची भागीदारी केली. 
 
या PAK खेळाडूंनी मिळवून दिला विजय...
अझहर अली : 59 धावा केल्या. फखर जमानसह शतकी भागीदारी केली.
फखर जमान : 114 धावा केल्या 106 चेंडूंत. टीमचा टॉप स्कोअरर
मोहम्मद हाफिज : 5व्या स्थानावर फलंदाजी करत 57 धावा कुटल्या आणि टीमची धावसंख्या 300 पार नेली.
हसन अली : 19 धावा देऊन 3 विकेट घेतल्या.
 
भारताच्या पराभवाची 5 कारणे...
 
1# भारतीय गोलंदाजांना लवकर मिळाला नाही ब्रेक-थ्रू
-जसप्रीत बुमराह, आर. अश्विन, रवींद्र जडेजा आणि हार्दिक पंड्यासारखे स्पेशालिस्ट भारतीय गोलंदाज सुरुवातीला विकेट मिळवण्यात अपयशी ठरले. सामन्यात सुरुवातीलपासूनच पाक फलंदाज वरचढ ठरले आणि पहिल्या विकेटसाठी त्यांनी शतकी भागीदारी केली. अझहर अली आणि फखर जमान यांनी पहिल्या विकेटसाठी 128 धावांची भागीदारी केली. याशिवाय पाक फलंदाजांनी दुसऱ्या विकेटसाठी 72 तसेच 5व्या विकेटसाठी 71 धावांची भागीदारी केली.
 
पुढच्या स्लाइड्समध्ये पाहा, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये भारताच्या पराभवाची आणखी कोणती 4 कारणे आहेत...
बातम्या आणखी आहेत...