स्पोर्टस डेस्क - काही दिवसांपूर्वीच वडील बनलेल्या क्रिकेटपटू रवींद्र जडेजाने त्याच्या मुलीचे नाव निश्चित केले आहे. याचा खुलासा त्याने सोशल मीडियावर केला. जडेजाने ट्विट केले की, 'आम्ही आमच्या लिटिल प्रिन्सेसचे नाव निधयाना ठेवले आहे.' निधयानाचा अर्थ आहे 'उल्लेखनीय ज्ञान'. जडेजाची पत्नी रिवाबाने 8 जून रोजी कन्यारत्नाला जन्म दिला. तेव्हा रिवाबा जामनगरमध्ये होती. परंतु जडेजा इंग्लंडमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी खेळत होता. जडेजा-रिवाबाचे लग्न 17 एप्रिल 2016 रोजी झाले होते.
पुढच्या स्लाइड्समध्ये पाहा टीम इंडियाच्या आणखी काही खेळाडूंच्या मुलांची वैशिष्ट्यपूर्ण नावे...