आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

असा उडवला श्रीलंकेचा धुव्वा, भारतीय गोलंदाजांसमोर श्रीलंकन फलंदाजांनी टाकली नांगी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्पोर्ट्स डेस्क - नागपूर येथील दुसऱ्या कसोटीत भारताने श्रीलंकेवर डाव आणि 239 धावांनी विजय मिळवला आहे. श्रीलंकेचा संपूर्ण संघ 166 धावांत गारद झाला. सामन्याच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी फलंदाजांनी मैदानावर राज्य गाजवल्यानंतर, चौथ्या दिवशी भारतीय गोलंदाजांनी श्रीलंकन फलंदाजांची दाणादाण उडवली. रवीचंद्रन अश्विनने श्रीलंकेचा दहावा गडी बाद करत, सर्वात कमी सामन्यांत 300 कसोटी बळींचा विक्रमही पूर्ण केला. त्याने दुसऱ्या डावात 4 तर सामन्यात एकूण 8 विकेट घेतल्या. श्रीलंकेच्या दुसऱ्या डावाचा विचार करता चंडिमलच्या 61 धावा वगळता इतर कोणाला फारशी कमाल करता आली नाही. लकमलने शेवटी काही फटके लगावले त्याने 31 धावा केल्या. पण श्रीलंकेच्या 4 फलंदाजांना भोपळाही फोडता आला नाही. 


श्रीलंकेच्या फलंदाजांची गळती कशी झाली हे पाहुयात पुढील स्लाइड्सवर...

बातम्या आणखी आहेत...