आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

...तर क्रिकेटर नव्हे मच्‍छिमार असते सुनील गावसकर, वाचा त्यांच्या जन्माची कहाणी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्पोर्ट्स डेस्क- भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार सुनील गावसकर यांचा आज (10 जुलै) 68 वा वाढदिवस साजरा करत आहेत. 80 च्‍या दशकात गोलंदाजांसाठी दरारा बनून राहिलेले गावसकर आपल्‍या आयुष्‍यात नशिब आणि अंधविश्‍वासालाही स्‍थान देतात. त्‍यांच्‍या विषयीच्‍या दहा गोष्‍टी वाचून तुम्ही दंग व्हाल. एका कोळ्याने पळवले होते गावसकरांना...
 
- गावसकर यांचा जन्‍म झाला तेव्‍हा मुंबईतील एका रूग्‍णालयात एका मच्‍छिमाराने नुकतेच जन्माला आलेल्या सुनील गावसकर या बाळाची व त्याच्या बाळाची अदलाबदली केली होती. मात्र त्‍यांचे काका नारायण मसुरेकर यांनी ही चोरी पकडली. गावसतर यांच्‍या डाव्‍या कानावर जन्‍मजात तिळ होता. त्‍याआधारे काकांनी सुनिल गावसकर यांचा शोध घेतला. तेव्‍हा बाळ सुनिल हा मच्‍छिमाराजवळ झोपलेला मिळाला. यावेळी गावसकर यांचे काका नसते तर, आज ते एका कोळ्याच्या घरात वाढले असते व कदाचित मासे पकडणारे मच्छिमार असते.
- याबाबत सुनील गावसकर म्हणतात, माझ्या करियरच्‍या सुरूवातीला नशिबानेच मला साथ दिली. 
- नशिबाने साथ दिल्यानेच मी क्रिकेटपटू बनू शकलो. अन्‍यथा माझ्या जन्‍माच्‍या वेळी घडलेली एक घटना मला मच्‍छिमार बनवू शकली असती. त्यामुळेच कोणी मानो न मानो पण नशिब व दैवी चमत्कार मी मानतो.
 
पुढे स्‍लाईडद्वारे वाचा, गावसकर यांच्याबाबत आपल्‍याला माहित नसणा-या दहा गोष्‍टी....
बातम्या आणखी आहेत...