आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पहिल्या वनडेत भारताने श्रीलंकेला हरविले, सोशल मीडियात आल्या या कमेंट्स

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्पोर्ट्स डेस्क- भारताने श्रीलंकेविरोधात पाच मॅचेसच्या वनडे सीरीजमधील पहिला सामना 9 विकेटने जिंकला. रविवारी दाम्बुलात झालेल्या या मॅचमध्ये टीम इंडियाने जबरदस्त पद्धतीने खेळताना एकतर्फी सामना जिंकला. या मॅचमध्ये शिखर धवनने शतक आणि कर्णधार विराट कोहलीने शानदार अर्धशतक ठोकले. टीम इंडियाच्या विजयानंतर क्रिकेट फॅन्सनी सोशल मीडियात मजेशीर कमेंट्स केल्या. असा राहिला मॅचचा रोमांच...
 
- मॅचमध्ये टॉस हारल्यानंतर प्रथम बॅटिंग करणा-या श्रीलंकेने टीम 43.2 षटकात 216 सर्वबाद झाली. यजमान संघाकडून निरोशन डिकवेलाने सर्वाधिक 64 धावा केल्या. 
- उत्तरादाखल भारताने 28.5 षटकात 220 धावा करत मॅच जिंकली. भारताकडून शिखर धवन आणि विराट कोहलीने दुस-या विकेटसाठी नाबाद 197 धावांची भागीदारी केली. 
- शिखर धवनने जबरदस्त शतक ठोकत 90 चेंडूत नाबाद 132 धावा केल्या. या खेळीत त्याने 20 चौकार आणि 3 षटकार ठोकले. तर विराट कोहलीने 70 चेंडूत नाबाद 82 धावांची खेळी केली. धवनला मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड मिळाला.
 
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, मॅचमध्ये टीम इंडियाच्या विजयानंतर आलेल्या फनी कमेंट्स...
बातम्या आणखी आहेत...