स्पोर्ट्स डेस्क - चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये भारत-पाकिस्तान संघ 18 जून रोजी किंगस्टनच्या ओव्हल मैदानावर दुपारी 2.30 भिडणार आहेत. सामन्यात टीम इंडिया किताबाची प्रबळ दावेदार मानली जात आहे. कारण आधीच्या सामन्यात भारताने पाकला जबरदस्त मात दिलेली आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी दोन्ही संघांचा हार-जीतचा रेकॉर्ड 2-2 असा आहे. तथापि, या हायव्होल्टेज सामन्यात अनेक क्रिकेट एक्स्पर्ट पाकिस्तानला भारी मानत आहेत.
सामन्यात विजयासह विराट बनवू शकतो रेकॉर्ड...
- विराट सध्या जबरदस्त फॉर्मात आहे. गतसामन्यात बांगलादेशविरुद्ध त्याने 96 धावांची खेळी केली. जर या सामन्यात त्याने शतक ठोकले तर पाकविरुद्ध सर्वात जास्त शतक ठोकणारा दुसरा भारतीय खेळाडू होईल.
टीम इंडियात नाही बदल...
फायनलआधी टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने टीममध्ये बदल करणार नसल्याचे सांगितले आहे. माजी क्रिकेटपटू राहुल द्रविडनेही विराटला असाच सल्ला दिला होता.
पाक संघात आमिरचे होऊ शकते पुनरागमन
- पाकिस्तानचा फास्ट बॉलर मोहंमद आमिर फायनलसाठी संघात पुनरागमन करू शकतो. शुक्रवारी ट्रेनिंग सेशनदरम्यान आमिर ओव्हलवर होता.
- तथापि, आमिरला भारत आणि द. आफ्रिकाविरुद्ध पहिल्या दोन सामन्यांत कुठलीच विकेट नाही मिळाली. परंतु श्रीलंकेविरुद्ध त्याने 2 विकेट मिळवल्या आणि 28 धावांचे महत्त्वाचे योगदान दिले.
पुढच्या स्लाइड्समध्ये पाहा, या हायव्होल्टेज सामन्यात भारतीय खेळाडू कोणकोणते रेकॉर्ड करू शकतात...