आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी 15 सदस्यीय संघाची घोषणा, आयपीएलच्या प्रदर्शनाचा निवडीसाठी आधार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- अखेर आगामी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारताच्या १५ सदस्यीय संघाची घोषणा करण्यात आली.  संघात युवराजसिंग, शिखर धवन, मोहंमद शमी, रोहित शर्माचासुद्धा समावेश आहे. हे खेळाडू सुमार फॉर्मशी संघर्ष करत होते. निवड समितीने आयपीएल-१० च्या प्रदर्शनाला निवडीचा आधार मानले नाही. चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी आयसीसीने ठरवलेल्या २५ एप्रिलच्या  मुदतीनंतर भारताने आपला संघ जाहीर केला आहे.  

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) सीनियर निवड समितीने आपल्या बैठकीनंतर १५ सदस्यीय संघाची आणि ५ पर्यायी खेळाडूंची निवड केली. चॅम्पियन्स ट्रॉफीला येत्या १ जूनपासून इंग्लंडमध्ये सुरुवात होणार आहे. येथे टीम इंडिया आपला किताब वाचवण्यासाठी खेळेल.   संघात सलामीवर म्हणून रोहित शर्मा आणि शिखर धवन आहेत. यासह अजिंक्य रहाणेसुद्धा सामील आहे. यष्टिरक्षकाची जबाबदारी महेंद्रसिंग धोनीकडेच असेल. धोनीच्या नेतृत्वाखालीच टीम इंडियाने इंग्लंडमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीचे विजेतेपद पटकावले होते. 

टीम इंडिया खालीलप्रमाणे
विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, रोहित शर्मा, केदार जाधव, युवराजसिंग, महेंद्रसिंग धोनी, अजिंक्य रहाणे, मनीष पांडे, हार्दिक पंड्या, जसप्रीत बुमराह, उमेश यादव, भुवनेश्वरकुमार, आर. अश्विन, रवींद्र  जडेजा, मो. शमी.   
राखीव : कुलदीप यादव, ऋषभ पंत, दिनेश कार्तिक, शार्दूल ठाकूर, सुरेश रैना.   
 
गंभीर, पंतला मिळाली नाही संधी...
आयपीएलमध्ये शानदार प्रदर्शन करत असलेला दिल्ली डेअरडेव्हिल्सचा विकेटकीपर फलंदाज ऋषभ पंत, संजू सॅमसन यांना भारतीय संघात स्थान मिळू शकले नाही. भारताचा वरिष्ठ क्रिकेटपटू गौतम गंभीरलासुद्धा संधी मिळाली नाही. आयपीएलमध्ये त्याचा फॉर्म बघता गंभीरला चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी संधी दिली पाहिजे, असे माजी कर्णधार सौरव गांगुलीने म्हटले होते.
 
धोनी जगात सर्वोत्तम विकेटकीपर : प्रसाद
भारतीय क्रिकेट निवड समितीचे अध्यक्ष एम. एस. के. प्रसाद यांनी महेंद्रसिंग धोनीबाबत सुरू असलेल्या चर्चेला पूर्णविराम दिला. धोनी जगातला सर्वोत्तम यष्टिरक्षक आहे, असे त्यांनी सांगितले. सुमार फाॅर्मानंतरही निवड समितीने त्याच्यावर विश्वास टाकला. युवा ऋषभ पंत भविष्याचे आशास्थान आहे. धोनीच्या निवृत्तीनंतर तो संघात स्थान मिळवू शकेल, असे त्यांनी सांगितले. धोनी जगातला सर्वोत्तम विकेटकीपर असल्याचे आम्ही सर्वजण मानतो. धोनी संघासाठी अतुल्य संपत्ती आहे, असेही त्यांनी म्हटले.

१२ दिवस उशिरा संघ जाहीर
चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारताला २५ एप्रिलपर्यंत संघ जाहीर करणे गरजेचे होते. मात्र, बीसीसीआय आणि आयसीसी यांच्यात सुरू असलेल्या वादामुळे संघ निवडीची डेडलाइन निघून गेली.  

- भारत या स्पर्धेत खेळेल की नाही यावर सस्पेन्स कायम होता. रविवारी दिल्लीत बीसीसीआयच्या एजीएममध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीत सहभागी होण्यासाठी संघाला परवानगी मिळाली. बीसीसीआयला आयसीसी कसलीही कायदेशीर नोटीस बजावणार नाही, असेसुद्धा यात ठरले होते.  
बातम्या आणखी आहेत...