आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टीम इंडियाचा श्रीलंका दौरा: जखमी मुरली विजय श्रीलंका दौऱ्याबाहेर; धवनचा समावेश

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- टीम इंडियाचा सलामीवीर मुरली विजय आगामी श्रीलंका दौऱ्यातून बाहेर झाला आहे. श्रीलंका दौरा सुरू होण्याआधीच भारतीय संघाला धक्का बसला आहे. मुरली विजय हाताच्या दुखापतीमुळे त्रस्त आहे. त्याच्या जागी शिखर धवनचा कसोटी संघात समावेश करण्यात आला आहे. शिखर धवन हाताच्या दुखापतीतून अजून पूर्णपणे बरा झालेला नाही. यामुळे तो मालिकेतून बाहेर झाला आहे.   

शिखर धवनने नुकत्याच झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीत आणि वेस्ट इंडीज दौऱ्यात चांगले प्रदर्शन केले होते. यानंतरही त्याला कसोटी संघात स्थान मिळू शकले नव्हते. मात्र, आता मुरली विजय जखमी झाल्याने शिखरसाठी कसोटी संघाची दारे खुली झाली. मुरली विजयला ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी मालिकेत दुखापत झाली होती. यामुळे तो आयपीएल-१० मध्येसुद्धा खेळू शकला नव्हता.  बीसीसीआयने एक प्रसिद्धिपत्रक जाहीर करून म्हटले की, ‘सीनियर निवड समितीने जखमी मुरली विजयच्या जागी शिखर धवनची श्रीलंका दौऱ्यासाठी निवड केली आहे.’

कसोटीत धवन
शिखर धवन भारताच्या वनडे संघाचा नियमित सदस्य आहे. मात्र, कसोटीत त्याचे स्थान स्थिर नाही. धवनने भारताकडून २३ कसाेटी सामने खेळताना ३८.५२ च्या सरासरीने ४ शतकांसह १४६४ धावा काढल्या आहेत. धवनने भारताकडून अखेरचा कसोटी सामना २०१६ मध्ये न्यूझीलंडविरुद्ध मालिकेत खेळला होता.

श्रीलंका दौऱ्यासाठी भारतीय संघ असा
विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे, लोकेश राहुल, शिखर धवन, चेतेश्वर पुजारा, रोहित शर्मा, रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, वृद्धिमान साहा, उमेश यादव, ईशांत शर्मा, हार्दिक पंड्या, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, अभिनव मुकुंद, कुलदीप यादव.  

 
बातम्या आणखी आहेत...