आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ins Vs Aus 2nd T20: India Win The T 20 Series In Australia First Time

मेलबर्नमध्ये भारताचा \"विजयदिन\', ऑस्ट्रेलियात प्रथमच जिंकली T20 मालिका

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
टीम इंडियाने असा केला विजयी जल्लोष... - Divya Marathi
टीम इंडियाने असा केला विजयी जल्लोष...
मेलबर्न- शुक्रवारचा दिवस भारतीय क्रीडाप्रेमींसाठी ऐतिहासिक ठरला. तब्बल तीन क्षेत्रांत भारतीय खेळाडूंनी ऑस्ट्रेलियन मैदान गाजवत प्रेक्षकांना अनोखी पर्वणी दिली. भारतीय महिला आणि पुरुष क्रिकेट संघांनी टी-२० क्रिकेट मालिकेत ऐतिहासिक विजय मिळवले. तर, सानिया मिर्झाने स्विस जोडीदार मार्टिना हिंगीससोबत मिळून ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेच्या दुहेरी गटात विजेतेपद पटकावले.

मेलबर्नमध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरू असलेल्या टी-२० क्रिकेट मालिकेतील दुसरा सामना २७ धावांनी जिंकून भारताने मालिकेत २-० ची विजयी आघाडी घेतली आहे. महिला संघाने ऑस्ट्रेलियाच्या महिला संघावर १० गड्यांनी विजय मिळवला. ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर प्रथमच दोन्ही संघांनी अशा प्रकारच्या द्विपक्षीय मालिकेत वर्चस्व गाजवले आहे. पुरुषांच्या टी-२० मध्ये भारताने दिलेल्या १८५ धावांच्या आव्हानाच्या प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाचा संघ २० षटकांत ८ गड्यांच्या बदल्यात १५७ धावाच काढू शकला. या विजयासोबतच टीम इंडियाने २००८ नंतर प्रथमच ऑस्ट्रेलियन भूमीवर ऐतिहासिक मालिका विजयाची नोंद केली आहे. सोबतच ऑस्ट्रेलियात दोन मालिका विजय मिळवणारा धोनी जगातला सातवा कर्णधार बनला आहे. मागील २६ वर्षांत टीम इंडियाचा हा ऑस्ट्रेलियातील तिसरा मालिका विजय आहे. या सामन्यात रोहित शर्मा (६०) आणि विराट कोहली (नाबाद ५९) यांची आक्रमक खेळी आणि गोलंदाजांच्या अप्रतिम कामगिरीच्या बळावर भारताने या विजयाची नोंद केली. दोन्ही संघांत मालिकेचा शेवटचा सामना ३१ जानेवारीला सिडनीत खेळला जाईल.

एमसीजीत खेळल्या गेलेल्या या लढतीत ऑस्ट्रेलियाने भारताला फलंदाजीचे आमंत्रण दिले. या निर्णयाचा फायदा उचलत भारताने २० षटकांत ३ गड्यांच्या बदल्यात १८४ धावा काढल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाने ८ गड्यांच्या बदल्यात १५७ धावा काढल्या.
ऑस्ट्रेलियाचा कर्णधार अॅरोन फिंचने ७४ तर शॉन मार्शने २३ धावा काढल्या. भारताकडून रवींद्र जडेजाने ३२ धावांच्या बदल्यात २, बुमराने ३७ धावांच्या बदल्यात ३ आणि अश्विन, पांड्या तसेच युवराज सिंग यांनी प्रत्येकी एक बळी मिळवला.
सहा बदल
या मालिकेतील पहिल्या टी-२० सामन्यातील पराभवानंतर ऑस्ट्रेलियाने या सामन्यासाठी सहा बदल केले. या सहा खेळाडूंपैकी बोलँड, टाय आणि लियोन यांनी पदार्पणाचा सामना खेळला.
पुढीस स्लाइडवर वाचा, कोणता ठरला सामन्याचा टर्निंग पॉइंट, कोणत्या होत्या भारताच्या विजयातील खास बाबी... आणि धावफलक...