आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धोनी- विराटला भारी पडला हा 10 लाखाचा क्रिकेटर, पुण्यात झालीय जडण-घडण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
राहुल त्रिपाठी - Divya Marathi
राहुल त्रिपाठी
स्पोर्ट्स डेस्क- कोलकाता नाईट रायडर्सविरूद्ध पुण्याच्या विजयाचा हिरो ठरलेला राहुल त्रिपाठी हा धोनी आणि विराट सारख्या करोडोंची किंमत असणा-या स्टार क्रिकेटर्संना भारी पडताना दिसत आहे. पुणे सुपरजाइंटने राहुल त्रिपाठीला 10 लाखाच्या बेस प्राईजला खरेदी करत डेब्यू करण्याची सधी दिली. या संधीचे सोने करताना राहुल त्रिपाठीने 9 मॅचमध्ये 352 धावा काढत टॉप-5 प्लेयर्समध्ये स्थान पटकावले. तर, स्टार प्लेयर्स एमएस धोनी 26th आणि विराट कोहली 16th स्थानावर घसरले आहेत. या आयपीएलमध्ये अशी आहे राहुलची कामगिरी....
 
- राहुलने या सीजनमध्ये 9 मॅचेसपैकी 155.05 च्या स्ट्राईक रेटने 352 धावा काढल्या आहेत. या दरम्यान त्याने 38 चौकार आणि 16 षटकार ठोकले आहेत.
- दुसरीकडे, टीमचा माजी कर्णधार एमएस धोनीबाबत बोलायचे झाल्यास धोनीने या सीजनमध्ये 11 मॅचेसमध्ये 204 धावा काढल्या आहेत.
- याशिवाय प्ले ऑफमधून बाहेर झालेली रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा कर्णधार विराट कोहलीने 7 मॅचेसमध्ये 239 धावा केल्या आहेत.
 
आपल्या झंझावती खेळीच्या जीवावर एकट्याने जिंकवले पुण्याला-
 
- आयपीएलमध्ये कोलकाताविरूद्ध 93 धावांची शानदार खेळी करणा-या राहुल त्रिपाठीने आपल्या परफॉर्मन्सने सर्वांचे मन जिंकले. 
- राहुलने 93 धावा काढताना 52 चेंडू खेळले तर यादरम्यान त्याने 9 चौकार आणि सात षटकार ठोकले.
- त्यांच्या झंझावती खेळीमुळे रायजिंग पुणे सुपरजाइंटने आयपीएल-10 च्या लढतीत कोलकाता नाईटरायडर्सला चार विकेटने पराभूत केले.
- कोलकाता नाईटरायडर्सने या मॅचमध्ये सर्व विकेट गमावून 155 धावा केल्या. त्याला प्रत्त्युत्तर देताना पुणे टीमने 19.2 षटकात 6 विकेट गमावत लक्ष्य पार केले. 
 
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, राहुल त्रिपाठीच्या लाईफशी संबंधित इंटरेस्टिंग Facts...
राहुल त्रिपाठीच्या खेळीमुळे गौतम गंभीरची केकेआर टीम हारताच सोशल मिडियात आल्या या कमेंट्स...
बातम्या आणखी आहेत...