आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Interesting Facts About Indian Cricket And Cricketers

हा मराठमोळा क्रिकेटर होता भारताचा पहिला वन डे कॅप्टन, वाचा FACTS

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
क्रिकेट हा भारताचा राष्ट्रीय खेळ नसला तरीही, भारतामध्ये क्रिकेटबाबातची क्रेझ किती आहे हे वेगळे सांगायची गरज नाही. सुनिल गावस्क, सचिन तेंडुलकर, कपिल देव, महेंद्रसिंग धोनी आणि अशी अनेक नावे याठिकाणी घेता येतील जे क्रिकेटच्या चाहत्यांसाठी अक्षरशः देव बनले आहेत.

हल्लीच्या काळात क्रिकेटला अधिक ग्लॅमर मिळाले असले तरी, त्यापूर्वीही क्रिकेट अगदीच दुर्लक्षित असे कधीही नव्हते. लोकांनी सुरुवातीपासूनच या खेळाला डोक्यावर उचलून धरले. अगदी सुरुवातीच्या काळाचा विचार करता भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील वन डे टीमचा पहिला कर्णधार हा मराठी होता. भारतीय क्रिकेटशी संबंधित अशीच काही रंजक माहिती आज आपण जाणून घेणार आहोत.
पहिल्या वनडे कर्णधाराने खेळल्या फक्त दोन मॅच
भारताचे माजी कर्णधार अजित वाडेकर हे भारताच्या एकदिवसीय संघाचे (वन डे) पहिले कर्णधार होते. पण ते केवळ दोन एकदिवसीय सामने खेळू शकले होते. इंग्लंडमध्ये प्रुडेंशियल ट्रॉफीमध्ये वाडेकर खेळले होते. या दोन सामन्यांत वाडेकर यांनी 36.50 च्या सरासरीने 73 धावा केल्या होत्या. भारताने हे दोन्ही सामने मोठ्या फरकाने गमावले होते.
पुढील स्लाइड्सवर जाणून घ्या अशीच काही रंजक माहिती...