आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अशी दिसत होती पहिली क्रिकेट बॅट, जाणून घ्‍या काही रंजक बाबी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फलंदाजांना धावांचा पाऊस पाडण्‍यात साथ देणारी महत्‍त्वाची वस्‍तू म्‍हणजे त्‍याची बॅट. या बॅटच्‍या आताच्‍या स्‍वरूपामागे 17 व्‍या शतकापासूनचा रंजक इतिहास आहे. सध्‍या दिसणारी बॅटची डिझाइन ही इंग्‍लंडमधील रेल्‍वे अभियंता असलेल्‍या चार्ल्‍स रिचर्डसन यांनी 1880 मध्‍ये शोधून काढली. त्‍यानंतरही बॅट मोठ्या प्रमाणात बदलत गेली नि आज क्रिकेट या खेळासाठी ठरवण्‍यात आलेल्‍या नियमानुसार बॅट वापरली जाते. तसे बंधनकारकही आहे. divyamarathi.com च्‍या या पॅकेजमधून जाणून घेऊया बॅट संदर्भातील काही खास बाबी..

1. बॅट ही पांढ-या विलो लाकडापासून तयार केली जाते. सेलिक्स अल्बा, किस्म कॅरुलिया या कच्‍च्‍या लाकडापासून बॅट तयार केली जाते. हा प्रकारचे लाकूड हे अधिक मजबूत असते, शिवाय फटक्‍यांमुळे ते तुटू शकत नाही व वजनही हलके असते. या लाकडाच्‍या संरक्षणासाठी त्‍यावर जवसाच्‍या तेलापासून प्रक्रीया केली जाते.
पुढील स्‍लाईड्सवर वाचा, बॅटबाबतच्‍या काही रंजक बाबी..