स्पोर्ट्स डेस्क- ऑस्ट्रेलियाचा अव्वल वेगवान गोलंदाज मिशेल स्टार्कने आयपीएलच्या दहाव्या हंगामातून माघार घेतली आहे. मिशेल यंदाची आयपीएल खेळणार नसल्याने विराट कोहलीच्या बंगळुरू संघाला धक्का बसला आहे. 6 फूट 5 इंच उंचीचा मिशेल स्टार्क एक बॉलर म्हणून परफेक्ट गोलंदाज आहे. त्याचा अचूक, यॉर्कर व स्विंग गोलंदाजींनी भल्याभल्यांची भंबेरी उडालेली आपण पाहिली आहे. खरं तर त्याला वेगवान गोलंदाज बनायचे नव्हते तर बनायचे होते एक विकेटकीपर. पण तो बनला गोलंदाज. मात्र त्याचे विकेटकीपिंगवरील प्रेम कमी झाले नाही. योगायोगाने म्हणा किंवा ठरवून पण त्याने लग्नही विकेटकीपर असलेल्या एलिसा हेली हिच्यासोबत केले. विकेटकीपर आहे पत्नी...
- स्टार्कचे विकेटकीपिंगवर एवढे प्रेम होते त्याला एका विकेटकीपर असलेल्या तरूणीवर प्रेम झाले.
- ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट टीमची कीपर एलिसा हेलीशी त्याने अनेक काळ डेटिंग केले.
-दोघांनी गेल्या वर्षी लग्न केले. ते दोघे क्रिकेट इतिहासातील तिसरे कपल आहे, ज्यांनी आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेट खेळले आहे.
- स्टार्कचा छोटा भाऊ ब्रॅंडन लॉन्ग जंपर आहे. ज्याने रियो ऑलिंपिकमध्ये सहभाग घेतला होता.
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, मिशेल स्टार्क आणि त्याच्या विकेटकीपर वाईफचे इंटरेस्टिंग फोटोज...