आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वनडेला वाचवण्यासाठी आयसीसी घेणार लीग

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दुबई - पन्नास षटकांच्या क्रिकेटपासून दूर होत असलेल्या प्रेक्षकांचा विचार करून आयसीसीने वनडेत बदल करण्याची योजना केली आहे. यानुसार २०१९ पासून जगभरातील १३ संघांसोबत एक नव्या लीगचे आयोजन करण्याची योजना आयसीसीची आहे. एडिनबर्ग येथे या महिन्याच्या अखेरीस होणाऱ्या आयसीसी परिषदेत यावर चर्चा केली जाईल. योजनेनुसार सर्व संघ तीन वर्षांत एकमेकांशी प्रत्येकी तीन-तीन सामन्यांची मालिका खेळतील. प्रत्येक संघ ६ मालिका घरच्या मैदानावर तर ६ मालिका बाहेर खेळेल. यात १० कसोटी संघाशिवाय अफगाण, आयर्लंड आणि एक असोशिएट टीम असेल.

छोट्या देशांनाही मिळणार भरपूर संधी
- कसोटी आणि टी-२० च्या मध्ये वनडे क्रिकेटचे महत्त्व सलगपणे कमी होत आहे.
- वर्ल्डकपशिवाय इतर महत्त्वाच्या वनडे स्पर्धांना प्रायोजकांची संख्या घटत आहे.
- क्रिकेट खेळणाऱ्या छोट्या देशांना साधारणपणे अधिक सामने खेळण्याची संधी मिळत नाही. यामुळे त्यांचा दर्जाही वाढत नाही. लीगमुळे आता त्यांचाही फायदा होईल.

प्रत्येक संघ ३६ सामने खेळणार
- २०१९ ते २०२१ पर्यंत प्रत्येक टीम एकूण ३६ सामने खेळणार
- टाॅप-२ संघात फायनलच्या स्वरूपात तीन वा पाच सामन्यांच्या मालिकेचे अायाेजन
- २०२२ मध्ये लीग हाेणार नाही. या वर्षात सर्व संघ २०२३ वर्ल्डकपच्या तयारी करतील.
- २०२३ मध्ये वर्ल्डकपनंतर नव्या लीगला सुरुवात, तीन वर्षांपर्यंत रंगणार
- सर्व संघ इतर वनडे मालिका वा स्पर्धा खेळण्यास स्वतंत्र्य असतील.
- या लीगमधील कामगिरीच्या बळावर संघाची क्रमवारी निश्चित हाेणार, ही वर्ल्डकपच्या पात्रतेसाठी अाधार देईल.
- १३ संघांच्या लीगमधील सर्वात तळात राहणारी टीम वर्ल्ड क्रिकेट लीग चॅम्पियनशिपमध्ये रेलिगेट हाेईल.
बातम्या आणखी आहेत...