आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नियम बदलले; क्रिकेटपटूला मैदानाबाहेर करू शकतील पंच, वाचा कोणते नियम बदलले

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लंडन - आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या नव्या नियमानुसार आता पंच शिस्तभंग केल्याप्रकरणी खेळाडूला मैदानाबाहेर करू शकतील. क्रिकेटचे नवे नियम एक ऑक्टोबर २०१७ पासूून लागू होतील. एमसीसीने ही शिफारस केली होती.
 
हे पाच नियम बदलले आहेत .... ते असे 
 
१ : पंच दाखवू शकतील रेड कार्ड 
खेळाडूंचे सुमार आणि आक्षेपार्ह वर्तन सुधारण्यासाठी हा नियम लागू करण्यात आला आहे. यात पंच खेळाडूंच्या चार लेवलच्या गुन्ह्याच्या आधारावर निर्णय घेतील. क्रिकेटपटूला मैदानाबाहेर पाठवता येईल.
 
२ : बॅटची रुंदी १०८ मिमी होणार
एमसीसीने बॅट आणि चेंडूच्या बरोबरीच्या टक्करसाठी बॅटचा आकार नियंत्रित करण्याचे ठरवले. आता बॅटची रुंदी १०८ मिमी तर जाडपणा ६७ मिमी, तर कोपऱ्याचा जाडपणा ४०  मिमीपेक्षा अधिक ठेवता येणार नाही. 
 
३ : धावबादचा नियमही बदलणार
फलंदाजाच्या बाजूने धावबादच्या नियमात बदल करण्यात आला आहे. आता फलंदाजाने बॅटी क्रीजमध्ये पोहोचवली मात्र डाइव्ह मारताना त्याचे शरीर हवेतच असेल तर त्याला धावबाद देता येणार नाही.
 
४ : आता ९ पद्धतीने होतील खेळाडू बाद
आता बाद होण्याच्या पद्धती १० हून ९ वर करण्यात आल्या आहेत. चेंडूला हाताने रोखण्यात येणारा ‘हँडल द बॉल’ आता  ‘अॉब्स्ट्रक्टिंग द फिल्ड’मध्ये गणले जाईल.
 
५ : गोलंदाज आधीच करू शकेल धावबाद 
गोलंदाज चेंडू टाकण्याच्या तयारीत रनअप घेत असताना त्यावेळी नॉनस्ट्रायकर फलंदाज क्रीजच्या बाहेर असेल तर गोलंदाज त्याला क्रीजमध्ये येण्याआधीच धावबाद करू शकेल.
 
सुधारणेची आशा : स्टिफेन्सन
एमसीसी क्रिकेट  प्रमुख जॉन स्टिफेन्सन म्हणाले, ‘आता वाईट वागणूक देणाऱ्या खेळाडूला दंडीत करण्याची वेळ आली आहे. अनेक ठिकाणी पंच या कारणामुळे खेळ साेडत आहेत. पंचांना शिस्तभंगाची प्रकरणे हाताळण्यास मदत होईल. याशिवाय खेळाडूंवरही आपल्या वागणुकीत बदल करण्याचा दबाव असेल.
बातम्या आणखी आहेत...