आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

इंग्लिश कर्णधाराने केला PAK बॉलरवर हल्लाबोल, इंझमाम उल हक भडकला

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मोहम्मद आमिर - Divya Marathi
मोहम्मद आमिर
कराची- पाकिस्तान टीम इंग्लंड दौ-यावर पुढील आठवड्यात जात आहे. मात्र, त्याआधीच इंग्लिश कर्णधाराने माईंड गेम खेळण्यास सुरुवात केली आहे. फिक्सिंग प्रकरणात शिक्षा भोगलेला पाकिस्तानी बॉलर मोहम्मद आमिरवर निशाणा साधला आहे. आमिरबाबत वक्तव्य करताना कर्णधाराने म्हटले आहे की, आमिरला विरोध केलाच जाईल आणि तो करायलाही हवा. विशेष म्हणजे पाकिस्तान संघाचा मागील इंग्लंड टौरा खूपच खराब गेला होता. तसेच दोन्ही संघादरम्यान कडवी वक्तव्ये पाहायला मिळाली होती. काय काय झाली बोलंदाजी...
- इंग्लंडचा कर्णधार अॅलिस्टर कुकने म्हटले आहे की, मला वाटते मोहम्मद आमिरवरून जरूर प्रतिक्रिया उमटतील आणि त्या उठणे साहिजकच आहे.
- जेव्हा तुम्ही अशा चूका करता तेव्हा तुम्हाला शिक्षेशिवाय खूप काही सोसावे लागते.
- आमिरला आता अशा काही गोष्टींचा सामना करावाच लागेल. पाकिस्तानचा इंग्लंड दौरा 14 जुलैपासून सुरु होत आहे.
- कुकने असेही म्हटले की, मी मोहम्मद आमिरवर नाही तर आपल्या टीमच्या सरावावर लक्ष केद्रिंत करीत आहे.
कुकवर भडकला इंझमाम-
- पाकिस्तान क्रिकेट संघाचे चीफ सिलेक्टर आणि पाकिस्तानचा माजी कर्णधार इंझमाम उल- हकने कुकच्या वक्तव्याचा कडक शब्दात निषेध केला आहे.
- इंझमाम म्हणाला, जर इंग्लंडची टीम पाकिस्तान आली आणि त्यांच्या एखाद्या खेळाडूविषयी पाकिस्तानच्या कर्णधाराने असे वक्तव्य केले तर कुकला कसे वाटेल.
- मला वाटते इंग्लिश कर्णधार अशी वक्तव्ये देऊन मोहम्मद आमिरवर आतापासूनच प्रेशर टाकण्याचा प्रयत्न करीत आहे.
- कारण फक्त इंग्लंडच नाही तर ऑस्ट्रेलिया- दक्षणि अफ्रिकेचे खेळाडूही त्याला घाबरतात. आमिर आमच्यासाठी इंग्लंडमध्ये मॅच विनर हो शकतो.

पुढे स्लाईड्सच्या माध्यमातून पाहा, मागील इंग्लंड दौ-यात काय झाले होते पाकिस्तानसोबत आणि मोहम्मद आमिरसोबत...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...