आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

IPL-10: पाेलार्डच्या झंझावाताने मुंबईचा राेमहर्षक विजय; गुजरात लायन्सची पुण्यावर मात

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बंगळुरू- सामनावीर पाेलार्डच्या (७०) झंझावाताच्या बळावर दाेन वेळच्या चॅम्पियन मुंबई इंडियन्सने दहाव्या सत्राच्या अायपीएलमध्ये राेमहर्षक विजय संपादन केला. राेहित शर्माच्या नेतृत्वात मुंबईने शुक्रवारी  विराट काेहलीच्या राॅयल चॅलेंजर्स बंगळुरूला धुळ चारली. मुंबईने ४ गड्यांनी सामना जिंकला. मुंबईने तिसऱ्या  विजयासह  गुणतालिकेत अव्वल स्थान गाठले. बंगळुरूचा हा तिसरा पराभव ठरला. कर्णधार काेहलीची (६२) झंुज अपयशी ठरली. 
 
प्रथम फलंदाजी करताना बंगळुरूने निर्धारित २० षटकांत ५ गडी गमावून १४२ धावा काढल्या हाेत्या. प्रत्युत्तरात मुंबई इंडियन्सने ६ गड्यांच्या माेबदल्यात १८.५ षटकांत सामना जिंकला. पाेलार्डसह कृणाल पांड्या (नाबाद ३७) व हार्दिक पांड्या (नाबाद ९) यांनी शानदार खेळी केली. 
 
धावांचा पाठलाग करणाऱ्या मुंबई इंडियन्सची निराशाजनक सुरुवात झाली. सलामीवीर पार्थिव पटेल (३), जाेस बटलर (२), कर्णधार राेहित शर्मा (०) अाणि मॅक्लीनघन (०) ही अाघाडीची फळी स्वस्तात बाद झाली. बंगळुरूच्या बद्रीने यातील तिघांना पॅव्हेलियनमध्ये परतावून लावताना विकेटची हॅटट्रिक केली. संकटात सापडलेल्या मुंबई इंडियन्सला सावरण्यासाठी पाेलार्डने कंबर कसली. 
 
पाेलार्ड-कृणालची भागीदारी...
मुंबईच्या विजयासाठी झंझावाती खेळी करणाऱ्या पाेलार्डला कृणाल पांड्याची महत्त्वाची साथ मिळाली. या दाेघांनी सहाव्या विकेटसाठी ९३ धावांची भागीदारी रचली.. त्यानंतर पांड्या बंधूंनी अभेद्य १९ धावांची भागीदारी करून मुंबईला विजय मिळवून दिला. 
 
बद्रीची खेळी व्यर्थ...
बंगळुरूच्या गाेलंदाज ब्रदीची खेळी व्यर्थ ठरली. ब्रदीने विकेटची हॅटट्रिक नाेंदवताना ४ षटकांत ९ धावा देत ४ बळी घेतले. त्याने हॅटट्रिक करताना पार्थिव पटेल, मॅक्लीनघन व राेहित शर्माला बाद केले. याशिवाय त्याने निितश राणालाही झेलबाद करून चार बळी पूर्ण केले.
 
मुंबईचा पाेलार्ड ठरला सामनावीर
मुंबई इंडियन्सचा तडाखेबंद फलंदाज पाेलार्ड हा सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला. त्याने मुंबईच्या विजयात अर्धशतकी खेळीचे महत्त्वपूर्ण याेगदान दिले. त्याने ४७ चेंडूंचा सामना करताना ३ चाैकार अाणि ५ षटकारांच्या अाधारे ७० धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. याशिवाय त्याने शानदार भागीदारीही रचली. 
 
मुंबई इंडियन्सचा विक्रम
मुंबईसाठी बंगळुरूविरुद्धचा विजय हा दुहेरी याेग जुळवून अाणणारा ठरला. या विजयासह मुंबई टीमने अायपीएलमध्ये अापल्या नावे विक्रमाची नाेंद केली. अायपीएलच्या इतिहासात प्रथमच काेणत्याही टीमने १० पेक्षा कमी धावात ४ विकेट गमावल्यानंतर प्रतिस्पर्धीवर विजय मिळवला. 
 
पुढील स्लाइडवर वाचा गुजरात लायन्सचा विजय; रायझिंग पुणे टीम पराभूत 
बातम्या आणखी आहेत...