Home »Sports »From The Field» Ipl 10- Sunriser Hyderabad Won The Match Against Delhi Daredevils

IPL-10: हैदराबादने पाजले दिल्लीला पाणी; 15 धावांनी विजयी, गुणतालिकेत दुसऱ्या स्थानी

वृत्तसंस्था | Apr 20, 2017, 05:45 AM IST

  • IPL-10: हैदराबादने पाजले दिल्लीला पाणी; 15 धावांनी विजयी, गुणतालिकेत दुसऱ्या स्थानी
हैदराबाद - आयपीएल-१० मध्ये सनरायझर्स हैदराबादने बुधवारी शानदार प्रदर्शन करताना दिल्ली डेअरडेव्हिल्सला १५ धावांनी हरवले. हैदराबादने केन विल्यम्सन (८९) आणि शिखर धवनच्या (७०) बळावर ४ बाद १९१ धावांचा डोंगर उभा केला. प्रत्युत्तरात दिल्ली डेअरडेव्हिल्सला ५ बाद १७६ धावाच काढता आल्या.
धावांचा पाठलाग करताना दिल्ली डेअरडेव्हिलसने आक्रमक सुरुवात केली. सलामीवीर सॅम बिलिंग्ज ९ चेंडूंत ३ चौकारांसह १३ धावा काढून बाद झाला. यानंतर करुण नायरने २३ चेंडूंत १ षटकार, ५ चौकारांसह ३३ धावा ठोकल्या. सलामीवीर संजू सॅमसनने ३३ चेंडूंत २ षटकार, ३ चौकारांसह ४३ धावा तर अँग्लो मॅथ्यूजने २३ चेंडूंत १ षटकार, २ चौकारांसह ३१ धावांचे योगदान दिले.दिल्लीकडून श्रेयस अय्यरने ३१ चेंडूंत २ षटकार, ५ चौकारांसह सर्वाधिक नाबाद ५० धावा काढल्या.
हैदराबादच्या १९१ धावा
सनरायझर्स हैदराबादने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ४ बाद १९१ धावांचा डोंगर उभा केला. त्यांच्याकडून सलामीवीर शिखर धवने ७० आणि न्यूझीलंडचा खेळाडू केन विल्यम्सनने ८९ धावांचे योगदान दिले. हेनरिक्सने नाबाद १२ आणि दीपक हुड्डाने नाबाद ८ धावा काढल्या. युवराज ३, वॉर्नर ४ धावा काढून बाद झाले. दिल्लीकडून या चारही विकेट क्रिस मॉरिसने घेतल्या. इतर गोलंदाज अपयशी ठरले.

दमदार फलंदाजी
हैदराबादचे फलंदाज केन विल्यम्सन आणि शिखर धवन यांनी दमदार फलंदाजी करताना १३६ धावांची शतकी भागीदारी केली. विल्यम्सनने ५१ चेंडूंत ५ षटकार, ६ चौकार ठोकून ८९ धावांची खेळी केली, तर धवनने ५० चेंडूंत १ षटकार आणि ७ चौकारांसह ७० धावा काढल्या. या दोघांच्या शतकी भागीदारीने सामन्याचे चित्र बदलले. या दोन्ही फलंदाजांना दिल्लीच्या क्रिस मॉरिसने बाद केले.

धावफलक
सनरायझर्स हैदराबाद धावा चेंडू ४ ६
वॉर्नर झे. मिश्रा गो. मॉरिस ०४ ०७ ०० ०
धवन झेे. मॅथ्यूज गो. मॉरिस ७० ५० ०७ १
विल्यम्सन झे. श्रेयस गो. माॅरिस ८९ ५१ ०६ ५
युवराज त्रि. गो. मॉरिस ०३ ०४ ०० ०
हेनरिक्स नाबाद १२ ०६ ०२ ०
दीपक हुड्डा नाबाद ०९ ०४ ०० १
अवांतर : ४. एकूण : २० षटकांत ४ बाद १९१ धावा. गडी बाद होण्याचा क्रम : १-१२, २-१४८, ३-१७०, ४-१७०. गोलंदाजी : जयंत यादव २-०-१६-०, क्रिस मॉरिस ४-०-२६-४, जहीर खान ४-०-३७-०, पॅट कमिन्वस ४-०-३७-०, मॅथ्यूज ३-०-४१-०, अमित मिश्रा ३-०-३३-०.
दिल्ली डेअरडेव्हिल्स धावा चेंडू ४ ६
सॅमसन झे. हेनरिक्स गो. सिराज ४२ ३३ ०३ २
बिलिंग्स झे. हुड्डा गो. सिराज १३ ०९ ०३ ०
करुण नायर धावबाद ३३ २३ ०५ १
ऋषभ् झे. वॉर्नर गो. युवराज ०० ०१ ०० ०
श्रेयस अय्यर नाबाद ५० ३१ ०५ २
मॅथ्यूज झे. जॉर्डन गो. कौल ३१ २३ ०२ १
क्रिस मॉरिस नाबाद ०० ०० ०० ०
अवांतर : ७. एकूण : २० षटकांत ५ बाद १७६ धावा. गोलंदाजी : भुवनेश्वर ४-०-२९-०, सिराज ४-०-३९-२, कौल ४-०-३२-१, रशीद ४-०-३३-०, हेनरिक्स ३-०-३२-०, युवराजसिंग १-०-६-१.

Next Article

Recommended