आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • IPL 13th Match Heroes And Villains Between KKR And KXI Punjab At Mohali On 19th April

IPL: पंजाबला हरवून कोलकाता टॉप पोझिशनला, हे 4 ठरले हीरो अन् ते 4 ठरले व्हिलन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मोहाली- आयपीएल-9 च्या 13 व्या सामन्यात मंगळवारी कोलकाता नाइटराइडर्सने किंग्ज इलेवन पंजाबचा 6 गडी राखून पराभव केला. पंजाबने दिलेल्या 138 धावांचे लक्ष्य कोलकाता संघाने 17.1 षटकांत पूर्ण केले. कोलकात्याने चार विकेट गमवत 141 धावा केल्या. या विजयाबरोबरच कोलकाता संघ प्वाइंट्स टेबलमध्ये टॉपला पोहोचला.
कोण ठरले विजयाचे हीरो आण पंजाबच्या पराभवाचे व्हिलन...
कोलकात्याच्या विजयाचे 4 हीरो
- रॉबिन उथप्पाः डावाची सुरुवात करण्यासाठी आला आणि अर्धशतक ठोकले, त्याने गंभीरच्या साथीने 82 धावांची भागिदारी करत विजय निश्चित करून दिला.
- गौतम गंभीरः नानेफेक जिंकूण गोलंदाजी करण्याचा निर्णय, गोलंदाजांचा योग्य वापर, फलंदाजीच्या वेळी उथप्पाला अधिक स्ट्राइक दिली.
- सुनील नारायणः रिद्धिमान साहा आणि ग्लेन मॅक्सवेलचा बळी. 4 षटकांत केवल 22 धावा दिल्या.
- मोर्ने मोर्केलः दोन बळी मिळवून पंजाबवर दबाव आणला.

पंजाबच्या पराभवाचे 4 व्हिलन
- मनन वोहराः डावाची सुरूवात करण्यासाठी आला, मात्र केवळ 8 धावा करून तंबूत परतला.
- डेव्हिड मिलरः कर्णधार असल्याने जबाबदारी दाखवणे आवश्यक होते. मात्र तो केवळ 6 धावा करून बाद झाला.
- ग्लेन मॅक्सवेलः आवश्यकता असताना बेजबाबदार फटका खेळून आऊट झाला.
- रिद्धिमान साहाः फलंदाजीची आणखी एक संधी गमावली, केवल 8 धावा करून तंबूत परतला.
पुढील स्लाइड्सवर जाणून घ्या.... सामन्याचे हीरो आणि व्हिलन ठरलेल्यांचा कसा होता परफॉर्मन्स...