आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • IPL 2017, Kings XI Punjab Vs. Rising Pune Supergiant Indore Holkar Cricket Stadium

IPL- 10 : किंग्ज इलेव्हनची रायझिंग पुणे सुपरजायंट्सवर 6 विकेटने मात

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंदूर- आयपीएल-२०१७ च्या चौथ्या सामन्यात किंग्ज इलेव्हन पंजाबने शनिवारी पुणे सुपरजायंट्सला ६ विकेटने हरवले. इंदूरच्या स्टेडियमवर आपला पहिला सामना खेळणाऱ्या पंजाबने १६४ धावांचे लक्ष्य ४ गड्यांच्या मोबदल्यात सहजपणे गाठले. पंजाबने १ षटक आणि ६ गडी शिल्लक ठेवून बाजी मारली. आपल्या पहिल्याच सामन्यात नेतृत्व करत असलेला पंजाबचा कर्णधार ग्लेन मॅक्सवेलने अवघ्या २० चेंडूंत ४४ धावांची तुफानी खेळी केली आणि विजयात महत्त्वाचे योगदान दिले. मॅक्सवेलच ‘मॅन ऑफ द मॅच’ ठरला.

किंग्ज इलेव्हन पंजाबने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. पहिल्याच षटकात संदीप शर्माने मयंक अग्रवालला शून्यावर बाद केले. दुसऱ्या विकेटसाठी अजिंक्य रहाणे (१९) आणि स्टीव्हन स्मिथ (२६) यांनी ३५ धावांची भागीदारी केली. दोघांवर धावगती वाढवण्याचा दबाव होता. नवव्या षटकात स्मिथ बाद झाल्यानंतर १२ व्या षटकात माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीसुद्धा अवघ्या ५ धावा काढून बाद झाला. पुण्याची टीम ४ बाद ७४ धावा अशी संकटात सापडली. यानंतर बेन स्टोक्सने (५०) आयपीएलमध्ये आपले पहिले अर्धशतक ठोकताना संघाचा स्कोअर १५० च्या पुढे पोहोचवला. मनोज तिवारीने (नाबाद ४०) त्याच्यासोबत पाचव्या विकेटसाठी ६१ धावांची भागीदारी केली. स्टोक्सला १८ व्या षटकात अक्षर पटेलने बाद केले. अखेरीस डॅनियल क्रिस्टियनने वेगाने १७ धावा काढल्या. पुण्याने २० षटकांत ६ बाद १६३ धावा काढल्या. पंजाबकडून संदीप शर्माने २ तर मार्कस स्टोनिस, स्वप्निल सिंगने एक विकेट घेतली.
 
आमला, अक्षर खेळले
धावांचा पाठलाग करताना पंजाबकडून हाशिम आमलाने २७ चेंडूंत १ षटकार, २ चौकारांसह २८, मनन वोहराने ९ चेंेडूंत १४ धावा काढल्या. वोहराने १ षटकार, १ चौकार मारला. वृद्धिमान साहा ९ चेेंडूंत ३ चौकारांसह १४ धावा काढून बाद झाला. यानंतर मधल्या फळीत अक्षर पटेलने २२ चेंडंूत १ षटकार, एका चौकारासह २४ धावांचे योगदान दिले. 
 
मॅक्सवेल, मिलर तळपले
४ बाद ८५ अशा संकटानंतर ग्लेन मॅक्सवेल आणि डेव्हिड मिलरने पाचव्या विकेटसाठी ७.५ षटकांत ७९ धावांची अभेद्य भागीदारी केली. दोघांनी ७.५ च्या रनरेटने धावा काढल्या. मॅक्सवेलने २० चेंडूंत ४ षटकार, २ चौकारांसह नाबाद ४४ धावा तर डेव्हिड मिलरने २७ चेंडूंत २ षटकार, एका चौकारासह नाबाद ३० धावांचे विजयी योगदान दिले.
 
पुढील स्लाईद्वारे पाहा मॅचमधील काही फोटो...
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...