आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • IPL 2017 Live, Daredevils Vs Gujarat Lions In Delhi Feroz Shah Kotla Ground

DD Vs GL : सामन्यात 422 धावा; 31 षटकार, 24 चौकार बरसले, दिल्लीची गुजरातवर मात

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दिल्लीच्या विजयाचे शिल्पकार ऋषभ पंत आणि संजू सॅमसन. - Divya Marathi
दिल्लीच्या विजयाचे शिल्पकार ऋषभ पंत आणि संजू सॅमसन.
नवी दिल्ली - युवा खेळाडू ऋषभ पंत (९७) आणि संजू सॅमसन (६१) यांच्या तुफानी फलंदाजीच्या बळावर दिल्ली डेअरडेव्हिल्सने गुरुवारी आयपीएलमध्ये गुजरात लायन्सला ७ विकेटने हरवले. गुजरातने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ७ बाद २०८ धावांचा डोंगर उभा केला. दिल्लीने १७.३ षटकांत २१४ धावा काढून लक्ष्य गाठले. संजू सॅमसनने अवघ्या ३१ चेंडूंत ७ षटकारांच्या साह्याने १९६.७७ च्या स्ट्राइक रेटने ६१ धावा ठोकल्या. तर ऋषभ् पंतने ४३ चेंडूंत ९ षटकार आणि ६ चौकारांच्या मदतीने २२७.५८ च्या स्ट्राइक रेटने ९७ धावा चोपल्या. पंतचे शतक अवघ्या ३ धावांनी हुकले. या सामन्यात तब्बल ४२२ धावा निघाल्या. यात ३१ षटकार आणि २४ चौकार बरसले. 

धावांचा पाठलाग करताना दिल्लीकडून करुण नायर ११ चेंडूंत १२ धावा काढून बाद झाला. यानंतर सॅमसन-पंत जोडीने गुजरातच्या गोलंदाजांचा समाचार घेतला. दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी ११.१ षटकांत १४३ धावांची भागीदारी केली आणि दिल्लीचा विजय सोपा केला. यानंतर अँडरसनने नाबाद १८ आणि श्रेयस अय्यरने नाबाद १४ धावा काढून विजयाची औपचारिकता पूर्ण केली.
 
तत्पूर्वी, गुजरात लायन्सने सुरेश रैनाच्या ७७ आणि दिनेश कार्तिकच्या ६५ धावांच्या बळावर २०८ धावांचे लक्ष्य ठेवले. रैनाने ४३ चेंडूंत ५ चौकार, ४ षटकारांसह ही खेळी केली. तर कार्तिकने ३४ चेंडूंत ५ षटकार, ५ चौकारांसह या धावा काढल्या. अॅरोन फिंचने २७ आणि रवींद्र जडेजाने ७ चेंडूंत २ षटकारांसह नाबाद १८ धावा काढल्या. इतरांनी केवळ हजेरी लावली. गुजरातकडून गोलंदाजीत संगवान, थम्पी आणि जडेजाने प्रत्येकी १ विकेट घेतली. 
 
पुढे स्लाईडद्वारे पाहा, दिल्ली- गुजरात सामन्यातील क्षणचित्रे...
 
(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...