आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • IPL 2017 Live, Daredevils Vs Sunrisers At Delhi Feroz Shah Kotla Cricket Updates Ball By Ball

DD Vs SH : अँडरसनचा विजयी चाैकार; दिल्लीची हैदराबादवर मात

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दिल्ली - युवा कर्णधार करुण नायरच्या नेतृत्वाखाली यजमान दिल्ली डेअरडेव्हिल्स संघाने मंगळवारी अायपीएलमध्ये अापल्या घरच्या मैदानावर शानदार विजय संपादन केला. यजमान टीमने डेव्हिड वाॅर्नरच्या सनरायझर्स हैदराबादवर गड्यांनी मात केली. काेरी अँडरसनने चाैकार मारून दिल्लीला विजय मिळवून दिला. दिल्ली टीमचा स्पर्धेतील हा तिसरा विजय ठरला. दुसरीकडे हैदराबाद टीमला चाैथ्या पराभवाला सामाेरे जावे लागले. 
 
काेरी अँडरसन (नाबाद ४१), करून नायर (३९), ऋषभ पंत (३४) अाणि श्रेयस अय्यर (३३) यांच्या धडाकेबाज फलंदाजीच्या बळावर दिल्लीने सामना जिंकला. 
 
प्रथम फलंदाजी करताना हैदराबादने निर्धारित २० षटकांत बाद १८५ धावा काढल्या. प्रत्युत्तरात दिल्लीने ५ गडी राखून विजयाचे लक्ष्य गाठले. धावांचा पाठलाग करणाऱ्या दिल्लीला संजू सॅमसन (२४) अाणि कर्णधार नायरने दमदार सुरुवात करून दिली. त्यांनी ४० धावांच्या भागीदारीची सलामी देताना विजयाचा मजबूत पाया राेवला. दरम्यान, सिराजने सॅमसनला बाद केले. त्यानंतर ऋषभ पंतने संघाचा डाव सावरला. त्याने नायरसाेबत ताेडीसताेड फटकेबाजी केली. या दाेघांनी दुसऱ्या गड्यासाठी ३२ धावांची भागीदारी रचली. नायरने २० चेंडूंत पाच चाैकार अाणि
दाेन षटकारांच्या अाधारे ३९ धावांची खेळी केली. 
 
युवराजचे अर्धशतक व्यर्थ 
तब्बल सहा सामन्यांनंतर फाॅर्मात अालेल्या युवराजसिंगने केलेले अर्धशतक व्यर्थ ठरले. त्याने ४१ चेंडूंचा सामना करताना ११ चाैकार अाणि एका षटकाराच्या अाधारे नाबाद ७० धावा काढल्या. त्याचे स्पर्धेतील हे दुसरे अर्धशतक ठरले. मात्र, त्याला टीमचा पराभव टाळता अाला नाही. 
 
काेरी अँडरसनचा झंझावात 
दिल्लीच्या विजयाचा शिल्पकार अँडरसनने नाबाद ४१ धावांचे याेगदान दिले. त्याने २४ चेंडूंत चाैकार षटकार ठाेकून ही खेळी केली. त्याने माेरीससाेबत (नाबाद १५) अभेद्य ४१ धावांची भागीदारी करून विजय निश्चित केला. 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...