आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • IPL 2017 Match 52, Live Cricket Score Daredevils Vs Rising Pune Supergiant In Delhi

IPL-10: दिल्ली डेअरडेव्हील्सची पुण्यावर मात; मनोज तिवारीची अर्धशतकी झुंज व्यर्थ

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दिल्ली- युवा फलंदाज करुण नायरच्या (६४) झंझावाती अर्धशतकाच्या बळावर  यजमान दिल्ली डेअरडेव्हिल्स संघाने शुक्रवारी अायपीएल-१० मध्ये धडाकेबाज विजय संपादन केला. दिल्ली संघाने अापल्या १३ व्या सामन्यात स्मिथच्या रायझिंग पुणे सुपरजायंट्सवर मात केली. दिल्ली संघाने घरच्या मैदानावर ७ धावांनी  सामना जिंकला. यासह दिल्लीने स्पर्धेत विजयाचा षटकार ठाेकला. दुसरीकडे  पुणे टीमला पाचव्या पराभवाचा सामना करावा लागला. याशिवाय विजय संपादन करून दुसरे स्थान गाठण्याचा पुणे संघाचा प्रयत्नही अपयशी ठरला.

प्रथम फलंदाजी करताना यजमान दिल्ली संघाने घरच्या मैदानावर ८ बाद १६८ धावा काढल्या. प्रत्युत्तरात पुणे संघाला ७ गड्यांच्या माेबदल्यात १६१ धावांपर्यंत मजल मारता अाली.

धावांचा पाठलाग करणाऱ्या पुण्याची निराशाजनक सुरुवात झाली. सलामीवीर अजिंक्य रहाणे (०) अाणि राहुल त्रिपाठी (७) हे दाेघे झटपट बाद झाले. त्यानंतर कर्णधार स्मिथ (३८) अाणि मनाेज तिवारीने (६०) संघाचा डाव सावरला. त्यांनी तिसऱ्या गड्यासाठी ३८ धावांची भागीदारी केली. मात्र, नदीमने स्मिथला बाद केले. त्यानंतर मनाेज तिवारीने स्टाेक्ससाेबत चाैथ्या गड्यासाठी अर्धशतकी भागीदारी केली. स्टाेक्सने २५ चेंडूंचा सामना करताना ३ चाैकार अाणि २ षटकारांच्या अाधारे ३३ धावांची खेळी केली. तिवारीने ४५ चेंडूंत ५ चाैकार व ३ षटकारांसह ६० धावा काढल्या. 

करुण नायर सामनावीर 
यजमान दिल्लीच्या युवा फलंदाज करुण नायरने झंझावाती अर्धशतक ठाेकले. त्याने ४५ चेंडूंचा सामना करताना ९ चाैकारांसह  ६४ धावांची खेळी केली. त्याने टीमला सन्मानजनक धावसंख्या उभी करून दिली.  त्याने ऋषभ पंतसाेबत (३६) तिसऱ्या गड्यासाठी ७४ धावांची भागीदारी रचली.
 
पुढे स्लाईडद्वारे पाहा, दिल्ली- पुणे सामन्यातील क्षणचित्रे....
बातम्या आणखी आहेत...