आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

IPL-7 : चेन्नईच्या दाेन खेळाडूंनी तरुणींसोबत रंगवली रात्र

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - गेल्या वर्षी म्हणजे आयपीएल-७ च्या मोसमात सहभागी झालेले क्रिकेट संघांचे मालक आणि खेळाडूंच्या मनमानी कारभाराच्या धक्कादायक कहाण्या आता उघडकीस आल्या आहेत. बीसीसीआयने आखून दिलेले नियम धाब्यावर बसवून अनेक संघमालकांनी पार्ट्या झोडल्याची तसेच दोन खेळाडूंनी अज्ञात तरुणी, महिलांसोबत रात्री रंगवल्याची माहिती हाती आली आहे.

बीसीसीआयच्या भ्रष्टाचारविरोधी पथकाचे प्रमुख रवी सावनी यांनी यासंदर्भात गेल्या मोसमात पत्र लिहून शिस्तभंगाची तक्रार केल्याचे वृत्त एका इंग्रजी वृत्तपत्राने दिले आहे. आयपीएल- ७ च्या दरम्यान संघ मालक, त्यांचे मित्र व खेळाडू यांनी बीसीसीआयने घालून दिलेले नियम, संकेत कसे पायदळी तुडवले याचे तारीखवार दाखलेच सावनी यांनी दिले आहेत. हा प्रकार १६ एप्रिल ते १ जून दरम्यान घडला. तेव्हा सुप्रीम कोर्टात भ्रष्टाचारप्रकरणी खटल्याची सुनावणी सुरू होती. पंजाब संघाचा खेळाडू त्याच्या मित्रासोबत हॉटेलमध्ये राहायचा. सामना संपल्यानंतर तो मित्र संघाच्या बसमधूनच फिरायचा, असे अहवालात म्हटले आहे.

सावनी यांच्या ई-मेलमधील खळबळजनक तपशील
८ मे २०१४ : मुंबईतील आयटीसी ग्रँड मौर्या हॉटेलमध्ये एका महिलेने सीएसकेच्या खेळाडूच्या खोलीत रात्री ९.५४ वाजता प्रवेश केला. दुसर्‍या दिवशी सकाळी ०६.०५ वाजता ती खोलीबाहेर पडली. याबाबत विचारले असता खेळाडूने ती मैत्रीण असल्याचे सांगितले.

९ मे २०१४ : - सीएसकेच्या अन्य एका खेळाडूने एका महिलेसोबत रात्र घालवली. तिने रात्री १०.१० वाजता त्या खेळाडूच्या खोलीत प्रवेश केला. दुसर्‍या दिवशी सकाळी साडेसात वाजता ती बाहेर पडली. याबाबत संबंधित खेळाडूला विचारले असता, ती आपली खास मैत्रीण असून आम्ही दोघे लवकरच लग्न करणार असल्याचे तो म्हणाला.

बीसीसीआयच्या भ्रष्टाचारविरोधी पथकाने महिलेविषयी चौकशी केल्यावर वेगळीच माहिती हाती आली. चेन्नईच्या खेळाडूसोबत रात्र घालवणारी ती महिला याआधी आयपीएल-६ च्या मोसमात श्रीशांत व अन्य काही खेळाडूंच्या संपर्कात होती. प्रेक्षक गॅलरीत बसून ती आरसीबीला चिअर अप करायची. तिच्याकडे ग्रीन कार्डही होते.
बातम्या आणखी आहेत...