आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • IPL 9 Five Hero Of Mumbai Indian Team Who Make Possible Win Against Kolkata Knightriders

मुंबईचा KKR वर दणदणीत विजय, रोहितसह हे ठरले विजयाचे \'हीरो\'

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्पोर्ट्स डेस्क- आयपीएल-9 च्या पाचव्या सामन्यात मुंबई इंडियन्सने कोलकाता नाइटराइडर्सचा 6 गडी राखून दणदणीत पराभव केला. कोलकात्याच्या ईडन गार्डन मैदानावर झालेल्या या सामन्यात केकेआरने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 5 गड्यांच्या मोबदल्यात 187 धावा केल्या. आव्हानाचा पाठलाग करताना मुंबई संघाने 5 चेंडू शिल्लक ठेवत 4 गड्यांच्या मोबद्यातच हे लक्ष्य गाठले.
हे आहेत विजयाचे हीरो...
- रोहित शर्मा
- जोस बटलर
- मिशेल मॅक्लिंघन
- हरभजनसिंग
- पार्थिव पटेल
रोहित शर्माः 54 चेंडू 84 धावा
- डावाच्या चौथ्याच षटकात पार्थिव पटेल धाव घेण्याच्या प्रयत्नात बाद झाला.
- यानंतर मुंबई संघ दबावात येतो की काय असे वाटत होते.
- मात्र रोहितने फटकेबाजी सुरूच ठेवली. यामुळे दुसऱ्या टोकाला असेल्या फलंदाजावर दबाव आला नाही.
- रोहितने पार्थिवसह 5.5 षटकांत 53 धावांची भागिदारी केली.
- याशिवाय हार्दिक पांड्यासोबत 34 आणि जोस बटलरच्या साथीने 66 धावांची भागिदारी करत विजय निश्चित केला.
- रोहितने 54 चेंडूंचा सामना करत 10 चौकार आणि 2 षटकार लगावले. त्याने 155 च्या सरासरीने धावा केल्या.
कुचकामी ठरली गंभीर-पांडेची धडाकेबाज खेळी....
- कोलकात्याची सुरुवात फार चांगली झाली नाही, डावाच्या चौथ्याच षटकांत रॉबिन उथप्पा (8) बाद झाला.
- यानंतर गौतम गंभीर आणि मनीष पांडे यांनी संघाची धुरा सांभाळली. त्यांनी 10 षटकांत 100 धावांची भागिदारी केली.
- मनीष पांडेने 29 चेंडूंचा सामना करताना 3 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने 52 धावा केल्या.
- मनीषचा बळी हरभजनसिंगने घेतला. तो भज्जीच्या चेंडूवर त्याच्याच हाती झेल देऊन बाद झाला.
- गौतम गंभीरने कर्णधाराला साजेशी खेली केली. त्याने 52 चेंडूत 64 धावा केल्या. त्याला हार्दिक पांड्याने बाद केले.
- गंभीरने आंद्रे रसेलसह 43 धावांची खेली केली.
पुढील स्लाइड्सवर सविस्तर जाणून घ्या, केण आणि का ठरले मुंबई विजयाचे हिरो...