आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • IPL 9 Live Sunrisers Hyderabad V Mumbai Indians At Hyderabad

MI vs SRH: वाॅर्नरचा अर्धशतकी दणका; हैदराबादची मुंबईवर मात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हैदराबाद - पराभवांची मालिका खंडित करून सनरायझर्स हैदराबाद संघ साेमवारी इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) विजयी ट्रॅकवर परतला. डेव्हिड वाॅर्नरच्या (नाबाद ९०) नेतृत्वाखाली यजमान हैदराबादने स्पर्धेतील अापल्या तिसऱ्या सामन्यात गतविजेत्या मुंबई इंडियन्सला पराभूत केले. हैदराबादने ७ गड्यांनी विजय संपादन केला. मुंबई इंडियन्सचा लीगमधील हा तिसरा पराभव ठरला.

प्रथम फलंदाजी करताना मुंबई इंडियन्स टीमने ६ बाद १४२ धावा काढल्या हाेत्या. प्रत्युत्तरात हैदराबाद संघाने १७.३ षटकांत ३ गड्यांच्या माेबदल्यात सामना जिकंला. वाॅर्नर सामनावीर ठरला.
नाणेफेक जिंकून यजमान हैदराबाद टीमने प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. कर्णधार डेव्हिड वाॅर्नरचा हा निर्णय भुवनेश्वरने सार्थकी लावला. त्याने पहिल्या षटकाच्या चाैथ्याच चेंडूवर विकेट काढली. त्याने मुंबईचा सलामीवीर मार्टिन गुप्तिलला (२) झेलबाद केले. त्यानंतर पार्थिव पटेल (१०) झटपट बाद झाला. अंबाती रायडूने एकाकी झंुज देताना मुंबईचा डाव सावरला. मात्र, त्याला साथ देणारे कर्णधार राेिहत शर्मा (५), बटलर (११) स्वस्तात बाद झाले. त्यानंतर कृणाल पंड्याने रायडूला माेलाची साथ दिली. या दाेघांनी पाचव्या विकेटसाठी शानदार ६३ धावांची भागीदारी केली. मुंबईच्या धावसंख्येला गती मिळाली. मात्र, बरिंदर सरनने ही जाेडी फाेडली. त्याने रायडूला झेलबाद करून टीमला बळी मिळवून दिला. रायडूने ४९ चेंडूंत तीन चाैकार अाणि दाेन षटकारांच्या अाधारे संघाकडून सर्वाधिक ५४ धावांची खेळी केली. त्याला साथ देणाऱ्या कृणालने २८ चेंडूंत नाबाद ४९ धावा काढल्या.
वाॅर्नरचे नाबाद अर्धशतक
सनरायझर्स हैदराबाद टीमचा कर्णधार डेव्हिड वाॅर्नरने नाबाद अर्धशतक ठाेकले. त्याने मुंबईची गाेलंदाजी फाेडून काढताना नाबाद ९० धावा काढल्या. त्याने ५९ चेंडूंत सात चाैकार व चार षटकारांच्या अाधारे ९० धावा काढल्या. त्याचे यंदाच्या सत्रातील हे दुसरे अर्धशतक ठरले. यापूर्वी त्याने बंगळुरूविरुद्ध ५८ धावा काढल्या हाेत्या.
कृणालचे सलग ३ षटकार
मुंबईचा युवा फलंदाज कृणाल पंड्याने झंझावाती फलंदाजी करताना नाबाद ४९ धावांची धडाकेबाज खेळी केली. त्याने प्रत्येकी तीन चाैकार अाणि षटकारांची अातषबाजी केली. त्याने सामन्यातील १४ व्या षटकात विपुल शर्माच्या चेंडूंवर सलग ३ षटकार ठाेकले. त्यानंतर रायडूने १ षटकार मारला. विपुलच्या या षटकांत चार षटकारांसह एकूण २६ धावांची मुंबईने कमाई केली.
पुढील स्‍लाइडवर पाहा, धावफलक आणि आयपीएल डायरी