आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • IPL 9: Mumbai Vs KXIP: Ambani Brother Cheers His Team Mumbai Indians

वजन घटवल्यानंतर ग्राउंडवर दिसले अंबानी 'युवराज', भावाबरोबर अशी केली मस्ती

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्पोर्ट्स डेस्क - पार्थिव पटेल (81) आणि अंबाती रायुडू (65) यांची जोरदार फटकेबाजी आणि नंतर जबरदस्त गोलंदाजीच्या बळावर मुंबई इंडियन्सने आयपीएल-9 च्या 21व्या सामन्यात सोमवारी किंग्ज इलेव्हन पंजाबवर 25 धावांनी विजय मिळवला. पंजाब क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात मुंबईने पंजाबसमोर 190 धावांचे आव्हान ठेवले होते. मात्र आव्हानाचा पाठलाग करताना पंजाब संघाला सात गड्यांच्या मोबदल्यात केवळ 164 धावाच करता आल्या.
अंबानी बंधूंनी अशी केली मस्ती...
-मुकेश अंबानींचा मुलगा आकाश आणि अनंत मुंबई इंडियन्सला चीअर करण्यासाठी स्टेडियमवर उपस्थित होते.
- यावेळी हे दोघेही फनी मूडमध्ये दिसून आले. विशेषतः 108kg वेट कमी करणारा अनंत.
- साधारण पणे शांत बसणारा अनंत सर्वाची भेट घेताना आणि मस्ती करताना दिसून आला.
- गप्पा मारताना त्याचा भाऊ आकाश त्याला अनेकदा छेडताना दिसला.
- किंग्ज इलेव्हन पंजाबची मालकीन प्रिती झिंटाही संघाला चिअर करण्यासाठी पोहोचली होती. मात्र तिच्या संघाला पराभवाचा सामना करताना लागला.

पुढील स्लाइड्सवर पाहा, अंबानी युवराजांची मस्ती करतानाचे आणि प्रिती झिंटाचे खास Photos...