आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजपासून IPLचा रोमांच, रणवीर सिंग, कतरिना कैफ, डॅवेन ब्राव्हो थिरकणार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जडेजासह गुजराती फेटा परिधान केलेला फोटो रैनाने िट्वटरवर पोस्ट केला. - Divya Marathi
जडेजासह गुजराती फेटा परिधान केलेला फोटो रैनाने िट्वटरवर पोस्ट केला.
मुंबई - इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) नवव्या सत्राला शुक्रवारपासून सुरुवात होत आहे. शुक्रवारी आयपीएलचा उद्घाटन सोहळा रंगणार असून क्रिकेट सामन्यांना शनिवारपासून सुरुवात होईल. बॉलीवूडचा स्टार रणवीर सिंग, अभिनेत्री कॅटरिना कैफ, जॅकलिन फर्नांडिस, "याे-याे' हनी सिंग या उद््घाटन सोहळ्याचे आकर्षण असतील. अमेरिकन पॉप स्टार क्रिस ब्राऊन भारतात आयपीएलच्या निमित्ताने पहिल्यांदा परफॉर्म करेल. त्याच्यासोबत अमेरिकन बँड मेजर लेजर, इंग्लिश रॅपर फ्यूज ओडिजी, जमैकाचा कलाकार नेलाह थोरबोर्नसुद्धा मंचावर असतील. आयपीएल उद््घाटन सोहळ्याचे थेट प्रक्षेपण सायंकाळी ७.३० वाजेपासून सोनी मॅक्स आणि सोनी सिक्स चॅनलवर केले जाईल. शनिवारपासून सलग सात आठवडे चाहत्यांसाठी आयपीएलच्या रूपाने चौकार, षटकारांच्या आतषबाजीस सुरुवात होईल.
स्पर्धेचे यंदाचे वेगळेपण
याआयपीएलचे वेगळेपण म्हणजे यंदा चेन्नई सुपरकिंग्ज आणि राजस्थान रॉयल्स या दोन टीम दिसणार नाहीत. या संघातील खेळाडू यंदा विविध संघांकडून खेळताना दिसतील. पिवळ्या जर्सीत गेले आठ आयपीएलमध्ये दिसणारा महेंद्रसिंग धोनी यंदा पुणे रायझिंग संघाकडून खेळेल. चेन्नई, राजस्थानच्या जागी यंदा पुणे रायझिंग आणि गुजरात लायन्स हे दोन नवे संघ खेळतील. धोनी पुण्याचा, तर सुरेश रैना गुजरातचा कर्णधार असेल.
पुण्याचीमदार धोनीवर : भारताच्यावनडे संघाचा कर्णधार महंेद्रसिंग धोनीवर पुणे रायझिंग संघाची मदार असेल. तोच पुण्याचा कर्णधार आहे. पुणे संघात धोनीसह अजिंक्य रहाणे, इंग्लंडचा केविन पीटरसन, द. आफ्रिकेचा फॉप डुप्लेसिस, एल्बी मोर्केल हे दिग्गज आहेत.

ब्रेथवेट दिल्लीकडून खेळणार : वर्ल्डकपटी-२० च्या फायनलमध्ये सलग चार षटकार ठोकून हीरो ठरलेला कार्लोस ब्रेथवेट आयपीएलमध्ये दिल्ली डेअरडेव्हिल्सकडून खेळणार आहे. ब्रेथवेट अष्टपैलू खेळाडू असून तो मध्यमगती गोलंदाज आणि तडफदार आक्रमक फलंदाज आहे. त्याच्या कामगिरीकडे तमाम चाहत्यांचे लक्ष असेल. तो आयपीएलमध्ये नवा तारा म्हणून उदयास येऊ शकतो.
पहिला सामना
9 एप्रिल: मुंबई इंडियन्स वि. पुणे रायझिंग सुपरजायंट्स
आयपीएलमध्ये खास
}एकूण ५६ साखळी सामने होतील.
}प्लेऑफ २४, २५, २७ मे ला होईल.
}२९ मे रोजी फायनल मुंबईत होईल.
}मुंबईमध्ये इंग्लंडचा बटलर खेळेल.
}दिल्लीचे कर्णधारपद जहीर खान भूषवेल.
} द्रविड दिल्लीचा मेंटर म्हणून कार्यरत.
} सुनील नरेन खेळण्याची शक्यता कमी.
} कॅलिस यंदा केकेआरचा कोच असेल.
ब्राव्होचा ‘डान्स’ सोहळ्याचे आकर्षण