आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

IPL-10: हैदराबादने गुजरातला धुतले; मुंबई इंडियन्सचा केकेअारला दणका

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हैदराबाद- गतचॅम्पियन सनरायझर्स हैदराबादने आयपीएल-१० मध्ये सलग दुसरा विजय मिळवला आहे. अफगाणचा लेगस्पिनर रशीद खानच्या (१९ धावांत ३ विकेट) हैदराबादने गुजरात लायन्सला नमवले. रशीद खानच्या गोलंदाजीमुळे हैदराबादने गुजरातला २० षटकांत ७ बाद १३५ धावांतच रोखले. यानंतर कर्णधार डेव्हिड वॉर्नर (नाबाद ७६) आणि मोईसेस हेनरिक्स (नाबाद ५२) यांच्या दमदार खेळीच्या बळावर हैदराबादने १५.३ षटकांत एका विकेटच्या मोबदल्यात लक्ष्य गाठले.   

वॉर्नरने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा िनर्णय घेतला. गुजरातकडून पहिल्या विकेटसाठी जेसन रॉय (३१) आणि ब्रेंडन मॅक्लुम (५) यांनी ३५ धावा जोडल्या. यानंतर रशीद खानने शानदार गोलंदाजी करून त्यांना एकापाठोपाठ एक धक्के दिले. रशीदने अॅराेन फिंच (३), सुरेश रैना (५) यांनाही बाद केले. यामुळे गुजरातची टीम ९ षटकांत ४ बाद ५७ धावा अशी संकटात सापडली. यानंतर डेवेन स्मिथ (३७) आणि दिनेश कार्तिक (३०) यांनी पाचव्या विकेटसाठी ५६ धावांची भागीदारी करून संघाला १०० चा टप्पा गाठून दिला. हैदराबादने पुनरागमन करून गुजरातला ७ बाद १३५ धावांवर राेखले. 
 
प्रत्युत्तरात हैदराबादकडून वॉर्नर-हेनरिक्स यांनी दुसऱ्या विकेटसाठी १०८ धावांची शतकी भागीदारी करून ९ विकेटने विजय साजरा केला. वॉर्नरने ४५ चेंडूंत ४ षटकार आणि ६ चौकार मारुन ७६ धावा काढल्या. हेनरिक्सने ३९ चेंडूंत ६ चौकारांसह नाबाद ५२ धावा जोडल्या. धवन ९ धावा काढून बाद झाला. 

वॉर्नरच्या ७००० धावा पूर्ण
- टी-२० मध्ये ७००० धावांचा टप्पा पूर्ण करणारा डेव्हिड वॉर्नर चौथा फलंदाज बनला.
- या खेळीच्या वेळी ६५ वी धाव घेताच वॉर्नरने टी-२० मध्ये ७००० धावांचा टप्पा गाठला. ९९६९ धावांसह क्रिस गेल अव्वलस्थानी आहे. ब्रेंडन मॅक्लुम ७४११ धावांसह दुसऱ्या तर ब्रेड हॉज ७३३८ धावांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे.

पुढील स्लाइडवर वाचा मुंबई इंडियन्सची ४ गड्यांनी मात; हार्दिकचा विजयी चाैकार
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.) 
बातम्या आणखी आहेत...