आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबादचा अंकित बावणे दिल्ली डेअरडेव्हील्स संघाकडून खेळणार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद -  औरंगाबादचा गुणवंत क्रिकेटपटू अंकित बावणेचे आयपीएल पदार्पण झाले. त्याला दिल्ली डेअरडेव्हिल्सने बेस प्राइसमध्ये (१० लाख रु.) संघात घेतले. अंकितने या सत्रात रणजीत ८ सामन्यांत ७०० धावा ठोकल्या होत्या. त्याने स्वप्निल गुगळेसोबत ५९४ धावांच्या भागीदाराचा विश्वविक्रम करताना नाबाद २५१* धावा ठोकल्या होत्या. 
 
-  अंकितला या सत्रातील  शानदार रणजी प्रदर्शनाचे फळ आयपीएल एंट्रीने मिळाले.
अंकितला क्रिकेटबरोबरच व्यायामाचीही चांगलीच आवड असल्याचे त्याच्या सोशल मीडिया अकाऊंट्सवरून पाहायला मिळते. या अकाऊंट्सवर पोस्ट केल्या जाणाऱ्या फोटोंमध्ये बहुतांश फोटो हे, त्याचे जिममधले असल्याचे पाहायला मिळालेले आहेत. चला तर मग पाहुयात त्याच्या सोशल मीडिया अकाऊंट्सवरील फोटोंची झलक. 

बोरगाव बाजारमध्ये जल्लोष... 
बोरगाव बाजार- सिल्लोडतालुक्यातील बोरगाव बाजारचे भूमिपुत्र तसेच प्रथम श्रेणी महाराष्ट्र क्रिकेट संघाचे सदस्य अंकित रामदास बावणे याची आय.पी.एल. २०१७ च्या दहाव्या सत्रासाठी दिल्ली डेअरडेव्हिल्स संघामध्ये निवड झाल्यामुळे बोरगाव बाजार येथील गावकऱ्यांच्या वतीने जल्लोष साजरा करण्यात येत आहे. अंकित बावणे हा मूळ सिल्लोड तालुक्यातील बोरगाव बाजार येथील रहिवासी आहे. अंकितने घेतलेल्या परिश्रम तसेच चिकाटीमुळे हे शक्य झाले असल्याचे अंकितच्या वडिलांनी दिव्य मराठीशी बोलताना सांगितले. 

अंकितने आपल्या प्रथम श्रेणी क्रिकेट सामन्याची सुरुवात २००७-२००८ मध्ये महाराष्ट्र संघाकडून कर्नाटक संघाविरुद्ध खेळताना केली होती. त्यानंतर अंकितने मागे वळून बघितले नाही प्रथम श्रेणी क्रिकेट सामने खेळत असताना अनेक विक्रम आपल्या नावे केले. नुकत्याच झालेल्या दिल्ली येथील रणजी क्रिकेट सामन्यात दिल्लीविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व अंकितने केले होते. यात अंकित बावणे आणि स्वप्निल गुगळे या जोडीने सत्तर वर्षांचा विक्रम मोडून काढत ५९४ धावा काढून इतिहास रचला होता. या सामन्यात अंकितने अपराजित खेळताना २५८ धावा केल्या होत्या. या विक्रमी खेळीचे फळ अंकितला मिळाले. 

आयपीएलमध्ये क्रिकेट सामने खेळण्यासाठी औरंगाबाद जिल्ह्यातून अंकित बावणे हा पहिलाच खेळाडू ठरणार आहे. एकेकाळी छोट्याशा गावात क्रिकेट खेळणारा अंकित आता आयपीएल सामने खेळताना पाहायला मिळणार असून बोरगाव बाजारच्या गावकऱ्यांची मान अभिमानाने उंचावणार आहे. बोरगाव गाव आता अंकित बावणेचे गाव म्हणून ओळखले जाणार आहे.
 
लवकरच भारतीय संघात दिसेल 
अंकितने घेतलेलेपरिश्रम तसेच चिकाटीमुळे हे शक्य झालेले आहे. अंकितचा अभिमान नातेवाइकांसह आमच्या परिवाराला होत आहे. आता अंकित भारतीय क्रिकेट संघाचे प्रतिनिधित्व करताना लवकरच दिसेल, अशी अपेक्षा आहे.
- रामदास बावणे, वडील. 
 
पुढील स्लाइड्सवर पाहा, अंकित बावणेचे सोशल मीडियावरील काही PHOTOS 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...