आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • IPL Live Cricket Score Knight Riders Vs Rising Pune Supergiant Match 41 At Kolkata Eden Gardens

KKR Vs RPS : राहुल त्रिपाठीचा झंझावात; पुण्याची केकेअारवर मात

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
काेलकाता - राहुल त्रिपाठीच्या (९३) झंझावाती अर्धशतकाच्या बळावर रायझिंग पुणे सुपरजायंट्सने एेतिहासिक ईडन गार्डनवर अायपीएलचा सामना जिंकला. पुणे संघाने यजमान काेलकाता नाइट रायडर्सला घरच्या मैदानावर धूळ चारली. पुणे संघाने ४ गड्यांनी विजय संपादन केला. पुणे टीमचा लीगमधील हा सातवा विजय ठरला. दुसरीकडे गाैतम गंभीरच्या काेलकाता टीमने पराभवाचा चाैकार मारला. 

प्रथम फलंदाजी करताना यजमान काेलकात्याने निर्धारित २० षटकांत ८ बाद १५५ धावा काढल्या हाेत्या. प्रत्युत्तरात रायझिंग पुणे सुपरजायंट्सने १९.२ षटकांत ६ गड्यांच्या माेबदल्यात विजयाचे लक्ष्य गाठले. धावांचा पाठलाग करणाऱ्या पुणे संघाची निराशाजनक सुरुवात झाली. सलामीवीर अजिंक्य रहाणे ११ धावांची खेळी करून पॅव्हेलियनमध्ये परतला. त्यानंतर कर्णधार स्टीव्हन स्मिथने (९) संघाचा डाव सावरला. त्याने सलामीच्या राहुल त्रिपाठीला माेलाची साथ दिली. या दाेघांनी दुसऱ्या गड्यासाठी ४८ धावांची भागीदारी रचून विजयाचा पाया मजबूत केला. दरम्यान, वाेक्सने कर्णधार स्मिथला बाद केले. स्टाेक्सने १४ धावांचे याेगदान दिले.
 
राहुल त्रिपाठीचे शानदार दुसरे अर्धशतक
पुणे संघाच्या युवा फलंदाज राहुल त्रिपाठीने झंझावाती खेळी करून विजयश्री खेचून अाणली. त्याने ५२ चेंडूंचा सामना करताना ९ चाैकार अाणि ७ षटकारांच्या अाधारे ९३ धावांची खेळी केली. यासह त्याने स्पर्धेत दुसरे अर्धशतक ठाेकले. याशिवाय त्याने टीमच्या विजयाचा मार्ग सुकर केला. तसेच त्याने स्टाेक्ससाेबत चाैथ्या विकेटसाठी ४३ धावांची शानदार भागीदारी करताना विजय निश्चित केला. 
 
 
क्रिस्टियनचा विजयी षटकार
डॅनियल क्रिस्टियनने शानदार षटकार ठाेकून पुणे संघाचा विजय निश्चित केला. त्याने १० चेंडूंचा सामना करताना एका षटकारासह सामन्यात नाबाद ९ धावांची उपयुक्त अशी खेळी केली. 
 
पुढे स्लाईडद्वारे पाहा, या सामन्यातील क्षणचित्रे...
बातम्या आणखी आहेत...