आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

IPL : कोलकाता नाइट रायडर्सने हैदराबादला हरवले; गुणतालिकेत पुन्हा अव्वल!

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोलकाता - दोन वेळेसची चॅम्पियन टीम कोलकाता  नाइट रायडर्सने आयपीएल-१० मध्ये शनिवारी गतचॅम्पियन सनरायझर्स हैदराबादला १७ धावांनी पराभूत केले. या विजयासह कोलकाताने गुणतालिकेत पुन्हा अव्वल स्थान गाठले आहे.
 
गतचॅम्पियन सनरायझर्स हैदराबादचा हा सलग दुसरा पराभव ठरला. अनुभवी खेळाडू रॉबिन उथप्पा केकेआरच्या विजयाचा शिल्पकार ठरला. मॅन आॅफ द मॅच उथप्पाने ३९ चेंडूंत ४ षटकार आणि ५ चौकारांसह ६८ धावांची अर्धशतकी खेळी केली. हैदराबादकडून भुवनेश्वरकुमारने शानदार गोलंदाजी केली. मात्र, त्याचे हे प्रदर्शन व्यर्थ ठरले.

वॉर्नरने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. कोलकात्याने ४० धावांत २ विकेट गमावल्या. सलामीवीर सुनील नरेन (६) आणि गौतम गंभीर (१५) हे लकवर बाद झाले. यानंतर रॉबिन उथप्पाने मनीष पांडेसोबत ७७ धावांची भागीदारी करून केकेआरला १०० च्या पुढे पोहोचवले. उथप्पाने ६८ आणि मनीष पांडेच्या ४६ धावांच्या खेळीमुळे केकेआरने ६ बाद १७२ धावांचा स्कोअर केला. भुवनेश्वरने शानदार गाेलंदाजी करताना ४ षटकांत २० धावांत ३ गडी बाद केले. भुवीशिवाय आशिष नेहरा, बेन कटिंग आणि रशीद खान यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.

प्रत्युत्तरात हैदराबादकडून शिखर धवन (२३) आणि डेव्हिड वॉर्नर (२६) यांनी ४६ धावांची सलामी दिली. हेनरिक्सने १३, युवराजने २६, दीपक हुड्डाने १३, बेन कटिंगने १५ धावांचे योगदान दिले. त्यांना हैदराबादला विजय मिळवून देता आला नाही.

उथप्पाला जीवदानाचा फायदा
उथप्पा शून्यावरच बाद झाला होता. मात्र, पंच अनिल दांडेकरच्या चुकीमुळे तो बचावला. याचा त्याने पूर्ण लाभ उचलला. उथप्पाने ३९ चेंडूंत ५ चौकार आणि ४ षटकार मारले. मनीष पांडेने ४६ धावांची खेळी केली. 

क्रिस वोक्स, सुनील नरेन चमकले
गोलंदाजीत केकेआरकडून क्रिस वोक्सने सर्वाधिक २ गडी बाद केले. फिरकीपटू सुनील नरेनने शानदार गोलंदाजी केली. नरेनने ४ षटकांत १८ धावांत १ विकेट घेतली. त्याने १० चेंडू निर्धाव टाकले. कुलदीपने एकाला टिपले.
 
हैदराबादचा डाव...
> डेव्हीड वॉर्नर आणि शिखर धवन दोघांनीही डावाची सावध सुरुवात केली. 
> शिखर ने काही फटके मारत धावांचा वेग वाढवला. 
> शिखरच्या एका फटक्याने त्यांच्याच संघ व्यवस्थापनाचा लॅपटॉप फोडला. 
> दुसऱ्या बाजुने वॉर्नरनेही चांगली फटकेबाजी सुरू केली. 
> 5 ओव्हरनंतर हैदराबाद बिनबाद 39 धावा. 
> सातव्या ओव्हरमध्ये पठाणच्या गोलंदाजीवर शिखर धवन 23 धावांवर बाद झाला. 
> वॉर्नरने काही फटकेबाजी केली, पण कुलदीप यादवच्या जाळ्यात तो अडकला आणि वोक्सच्या हाती झेल देत 26 धावांवर बाद झाला.
> 10 ओव्हरनंतर हैदकाबाद 2 बाद 59 धावा. 
> अकराव्या ओव्हरमध्ये वोक्सने स्वतःच्या गोलंदाजीवर झेल गेत ऑनरीकेजला बाद केले. 
> युवीने सलग दोन षटकार खेचत इरादे स्पष्ट केले. 
> सुनील नारायणच्या एका चेंडूवर बाहेर येत फटका मारण्याच्या प्रयत्नात असलेल्या दीपक हुडाला उथप्पाने स्टंपिंग करत बाद केले. 
> युवीने वोक्सला एका ओव्हरमध्ये एक षटकार आणि एक चौकार खेचला. 
> याच ओव्हरमध्ये आणखी एक फटका मारण्याच्या प्रयत्नात युवीचा फटका चुकला आणि तो झेलबाद झाला.
> पंधरा ओव्हपॉरनंतर हैदराबात 5 बाद 113
> बेन कटिंगने फटका मारण्याचा प्रयत्न केला पण तो थेट फिल्डरच्या हाती गेला आणि बोल्टला विकेट मिळाली. 
> कोलकात्याचा हैदराबादवर 17 धावांनी विजय
> रॉबीन उथप्पा ठरला मॅन ऑफ द मॅच 
 
असा रंगला केकेआरचा डाव...
> यापूर्वीच्या सामन्याप्रमाणेच नारायणला सलामीला उतरवण्यात आले आहे. 
> सुरुवातीला फटकेबाजी करण्याच्या उद्देशाने हा बदल करण्यात आला आहे. 
> पण या सामन्यात हा बदल कामी आला नाही. भुवीने तिसऱ्याच ओव्हरमध्ये नारायणचा त्रिफळा उडवला. 
> 5 ओव्हर्सनंतर कोलकाता 1 बाद 33 धावा 
> सुनील नारायण बाद झाल्याने, केकेआरला फारशी चांगली सुरुवात करता आली नाही. 
> राशीद खानने गंभीरला बाद करत हैदराबादला आणखी एक विकेट मिळवून दिली.
> रॉबीन उथप्पाने चांगली फटकेबाजी करत केकेआरचा डाव सावरला. 
> 10 षटकांत कोलकात्याच्या 2 बाद 78 धावा 
> फटकेबाजीच्या प्रयत्नात उथप्पा बाद, कटिंगने मिळवली महत्त्वाची विकेट
> 15 ओव्हरनंतर कोलकात्याच्या 3 बाद 124 धावा 
> मनीष पांडेची जोरदार फटकेबाजी 17 व्या षटकात कोलकाता 3 बाद 150 
> मनीष पांडेचे अर्धशतक हुकले 46 धावांवर भुवीने घेतली विकेट. 
> कोलकात्याला पाचवा धक्का
> सूर्यकुमार यादवला नेहराने 4 धावांवर बाद केले. 
> अखेरच्या ओव्हरमध्ये डीग्रेंडहोमचा भुवीने त्रिफळा उडवला. 
> कोलकाता 20 ओव्हर्समध्ये 6 बाद 172, हैदराबादसमोर 173 धावांचे आव्हान.
> भुवनेश्वर कुमारने तीन तर नेहरा, राशीद खान आणि कटिंग यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली. 
 
पुढील स्लाइड्सवर पाहा, सामन्याचे PHOTOS
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.) 
 
बातम्या आणखी आहेत...