आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मैदानांसाठी पिण्याचे पाणी नाही, फडणवीस म्हणाले- IPL राज्याबाहेर गेले तरी चालेल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - आयपीएल सामन्यांसाठी मैदाने व खेळपट्ट्या सज्ज करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या भरमसाट पाण्याबाबत उच्च न्यायालयाने फटकारल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आयपीएल सामने महाराष्ट्राबाहेर हलवले तरी चालतील; परंतु मैदानांसाठी पिण्याचे पाणी पुरवले जाणार नाही, असे स्पष्ट बजावले आहे.

मुंबई उच्च न्यायालयाने एका याचिकेवर सुनावणी करताना याबाबत गुरुवारी तीव्र शब्दांत फटकारले होते. शिवाय, याबाबत राज्य सरकारकडून स्पष्टीकरणही मागितले होते. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी हे वक्तव्य केले. मुंबई, पुणे व नागपूरमध्ये आयपीएल स्पर्धेतील एकूण २० सामने खेळवले जाणार आहेत.