आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणातून निर्दोष सुटलेला क्रिकेटर श्रीसंतचे अनेक चेहरे आतापर्यंत समोर आले आहेत. विविध प्रकरणांमुळे तो वादातही सापडला. स्पॉट फिक्सिंग प्रकरणाच्या चौकशीदरम्यान त्याचे हवाईसुंदरीसोबतही संबंध असल्याचे पुढे आले होते. आयपीएलमधील हा वाद त्याचे करियर संपुष्टात आणणारा होता. यामधून दोषमुक्त झाल्यावर त्याने देवाला थॅक्स म्हटले व आपल्या मुलीने जर गुगलवर सर्च केले. तर मी तिला क्रिकेटरच दिसायला हवे. असेही तो म्हणाला. श्रीसंतच्या खाजगी आयुष्यातील काही बाबी या पॅकेजमधून आपल्याला वाचायला मिळतील.
भाऊ संगीत कंपनीचा मालक, बहिण अभिनेत्री
शान्ताकुमारन नायर आणि सावित्री देवी हे श्रीसंतचे आई-वडिल आहेत. त्याचा भाऊ दिपू हा संगीत कंपनीचा मालक आहे, तर बहिण निवेदिता ही केरळमध्ये टीव्ही अभिनेत्री आहे. जावई मधू बालकृष्णन हे प्रसिद्ध दक्षिण भारतीय गायक आहेत.
पुढील स्लाईडवर क्लिक करून जाणून घ्या, फोटो आणि श्रीसंतच्या काही खास बाबी..