आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आयपीएल स्पॉट फिक्सिंग टाइमलाइन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
{ १० मे २०१३ : स्पॉट फिक्सिंगच्या आरोपात राजस्थान रॉयल्सचे तीन क्रिकेटपटू एस. श्रीसंत, अंकित चव्हाण आणि अजित चंडिलाला अटक झाली.
{ २१ मे २०१३ : सट्टेबाजांशी संबंध असल्याने अभिनेता विंदू दारा सिंगला मुंबईत अटक.
{ २४ मे २०१३ : श्रीनिवासनचा जावई गुरुनाथ मयप्पन याला मुंबई पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले.
{ २ जून २०१३ : बीसीसीआयच्या बैठकीत फ्रँचायझींच्या चौकशीसाठी दोन निवृत्त न्यायाधीशांची समिती गठीत.
{ ११ जून २०१३ : श्रीसंत व अंकित चव्हाण तुरुंगातून जामिनावर बाहेर.
{ २८ जुलै २०१३ : बीसीसीआयकडून गठीत समितीने राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपरकिंग्ज यांना क्लीन चिट दिली.
{ ३० जुलै २०१३ : बिहार क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष आदित्य वर्मा यांनी बीसीसीआयविरोधात मुंबई उच्च न्यायालयात पीआयएल दाखल केली. न्यायालयाने बीसीसीआयच्या समितीचा चौकशी अहवाल धुडकावला.
{ ५ ऑगस्ट २०१३ : चौकशी अहवालाला बाद ठरवल्याच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधत बीसीसीआयने सर्वोच्च न्यायालयात अपील दाखल केले.
{ १३ सप्टेंबर २०१३ : बीसीसीआयकडून श्रीसंत, चव्हाणवर आजीवन बंदी.
{ ७ ऑक्टोबर २०१३ : सर्वोच्च न्यायालयाने फिक्सिंगप्रकरणी चौकशीसाठी जस्टिस मुदगल समिती गठीत केली.
{ ३ नोव्हेंबर २०१४ : मुदगल समितीकडून चौकशी अहवाल सर्वोच्च न्यायालयाला सादर.
{ २२ जानेवारी २०१५ : सर्वोच्च न्यायालयाने मयप्पन आणि राज कुंद्रा आयपीएलमध्ये सट्टेबाजी केल्याप्रकरणी दोषी ठरवले. शिक्षा ठरवण्यासाठी न्यायाधीश आर. एम. लोढा यांच्या नेतृत्वात समिती गठीत केली.
{ १४ जुलै २०१५ : मयप्पन, कुंद्रा यांच्यावर आजीवन बंदी.
बातम्या आणखी आहेत...