आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • IPL T20 Live Updates | Kings XI Punjab Vs Rising Pune Supergiant, Match 4th At Indore

KXIP Vs RPS : किंग्स इलेव्हन पंजाबचा पुणे सुपरजायंट्सवर ६ विकेट्स राखून विजय

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बेन स्टोक्सला अक्षर पटेलने ५० धावांवर बाद केले. - Divya Marathi
बेन स्टोक्सला अक्षर पटेलने ५० धावांवर बाद केले.
इंदूर - येथे झालेल्या आजच्या सामन्यात किंग्स इलेव्हन पंजाबने पुणे सुपर जायंट्सचा ६ गडी राखून पराभव केला. कर्णधार ग्लेन मॅक्सवेलने केलेल्या खेळीच्या जोरावर पंजाबने हा विजय मिळवला. 
 
चांगली सुरुवात झाल्यानंतर इम्रान ताहीरने घेतलेल्या बळींच्या जोरावर किंग्ज इलेव्हन पंजाबचा डाव कोलमडला होता. पण मॅक्सवेलच्या मदतीने मिलरने केल्या भागीदारीच्या जोरावर पंजाबने विजय मिळवला. 
 
त्याआधी स्टोक्स (50), मनोज तिवारी (नाबाद 40) यांच्या फटकेबादीने पुण्याने निर्धारित 20 षटकात 6 बाद 163 धावा केल्या. पंजाबने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता.
 
 
पुण्याची खराब सुरुवात...
- सलामीवीर मयांक अग्रवाल केवळ १ धावेवर संदीप शर्माच्या गोलंदाजीवर बोल्ड झाला.
- तर आयपीएलचा पहिलाच सामना खेळणा-या एन. नटराजनने आपल्या दुस-याच चेंडूवर अजिंक्य रहाणे (१८) झेलबाद केले.
- रहाणेपाठोपाठ कर्णधार स्टीव्ह स्मिथ (२६) मार्कस स्टॉनिसच्या गोलंदाजीवर मनन वोहराकडे झेलबाद झाला.
- महेंद्रसिंग धोनी स्वप्निलच्या गोलंदाजीवर केवळ ५ धावांवर झेलबाद झाला. डेन ख्रिश्चियनने 17 धावांचे योगदान दिले.
 
बेन स्टोक्सचे आकर्षक अर्धशतक-
 
- यंदाच्या आयपीएल हंगामातील सर्वात महागडा खेळाडू बेन स्टोक्सने आकर्षक अर्धशतक ठोकले.
- स्टोक्सने 32 चेंडूत 2 चौकार आणि 3 षटकारांसह अर्धशतक ठोकले.
 
असे आहेत दोन्ही संघ-
 
रायजिंग पुणे सुपरजाइंट-अजिंक्य रहाणे, मयंक अग्रवाल, स्टीव स्मिथ, एमएस धोनी, बेन स्टोक्स, मनोज तिवारी, रजत भाटिया, राहुल चहल, क्रिश्चियन, इमरान ताहिर आणि अशोक डिंडा.
 
किंग्स इलेवन पंजाब- हाशिम अमला, मनन वोहरा, वृद्धीमान साहा, ग्लेन मॅक्सवेल, डेविड मिलर, मार्कस स्टॉनिस, अक्षर पटेल, स्वप्निल सिंह, मोहित शर्मा, संदीप शर्मा आणि टी. नटराजन.
 
पुढे स्लाईडद्वारे पाहा, या सामन्यातील क्षणचित्रे....
बातम्या आणखी आहेत...