आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • IPL2017 Match 43 Live Cricket Score Kings XI Punjab Vs Royal Challengers In Bengaluru

RCB Vs KXIP: पंजाबचे किंग्ज विजयी; बंगळुरूचा नववा पराभव

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बंगळुरू - ग्लेन मॅक्सवेलच्या नेतृत्वाखाली किंग्ज इलेव्हन पंजाब संघाने दहाव्या सत्राच्या अायपीएलमध्ये शानदार विजय संपादन केला. पंजाबने शुक्रवारी अापल्या दहाव्या सामन्यात यजमान राॅयल चॅलेंजर्स बंगळुरू टीमला धूळ चारली. पंजाबने धावांनी १९ धावांनी सामना जिंकला.

युवा खेळाडू संदीप शर्मा (३/२२) अाणि अक्षर पटेल (३/११) यांच्या धारदार गाेलंदाजीच्या बळावर पंजाबने शानदार विजय संपादन केला. पंजाबचा स्पर्धेतील हा पाचवा विजय ठरला. दुसरीकडे विराट काेहलीच्या बंगळुरूला नवव्या पराभवाचा सामना करावा लागला. 
 
प्रथम फलंदाजी करताना  पंजाबने निर्धारित २० षटकांत ७ गड्यांंच्या माेबदल्यात १३८ धावा काढल्या हाेत्या. प्रत्युत्तरात बंगळुरू संघाने घरच्या मैदानावर ११९ धावांत गाशा गुंडाळला. त्यामुळे टीमला लाजिरवाण्या पराभवाला सामाेरे जावे लागले..  
 
गेल, काेहलीचा फ्लाॅप शाे :  बंगळुरूचा स्फाेटक सलामीवीर क्रिस गेल  अाणि कर्णधार विराट काेहलीचा सामन्यात फ्लाॅप शाे झाला.  गेलला संदीप शर्माने शून्यावर बाद करून संघाला महत्त्वाचा बळी मिळवून दिला. त्यानंतर संदीपने काेहलीला (६) त्रिफळाचीत केेले.
 
मनदीपची एकाकी झुंज अपयशी : बंगळुरूचा युवा फलंदाज मनदीप सिंगने विजयासाठी दिलेली एकाकी झुंज अपयशी ठरली. त्याने ४० चेंडूंचा सामना करताना पाच चाैकार अाणि २ षटकारांच्या अाधारे संघाकडून सर्वाधिक ४६ धावांची खेळी केली.
 
सामनावीर संदीप
पंजाबचा युवा गाेलंदाज संदीप शर्माने शानदार खेळी केली. त्याने धारदार गाेलंदाजी करताना तीन विकेट घेतल्या. त्याने चार षटकांत २२ धावा देताना हे यश संपादन केले. तसेच कर्णधार ग्लेन मॅक्सवेलने शानदार गाेलंदाजी करून दाेन बळी घेतले. माेहित शर्माने एक अाणि अक्षर पटेलने  तीन गडी बाद केले.
 
असे आहेत दोन्ही संघ- 
 
बंगळुर- विराट कोहली, ख्रिस गेल, मनदीप सिंग, एबी डिविलर्स, केदार जाधव, शेन वॉटसन, पवन नेगी, सॅम्यूअल ब्रदी, श्रीनाथ अरविंद, अनिकेत चौधरी, यजूवेंद्र चहल.
 
पंजाब- मार्टिन गुप्टिल, हशीम आमला, मनन वोहरा, शॉन मार्श, ग्लेन मॅक्सवेल, वृद्धीमान साहा, अक्षर पटेल, मोहित शर्मा, वरून अॅरोन, संदीप शर्मा, टी. नटराजन.
 
(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...