आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रशिक्षकपदाचा वाद चॅम्पियन्स ट्रॉफी दरम्यानच उफळला, कुंबळेंवर विराट व टीम इंडिया नाराज

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
विराट कोहली आणि अनिल कुंबळे.... - Divya Marathi
विराट कोहली आणि अनिल कुंबळे....
स्पोर्ट्स डेस्क- बीसीसीआयने मागील आठवड्यात टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी अर्ज मागवले होते. बुधवारी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. मात्र, माध्यमांत आलेल्या वृत्तानुसार, कर्णधार विराट कोहली आणि कोच अनिल कुंबळे यांच्यात मतभेद असल्याचे समोर येत आहे. विराट आणि टीममधील काही वरिष्ठ खेळाडू कुंबळेंच्या कडक शिस्तीच्या पद्धतीवर नाराज आहेत. दरम्यान, हा प्रकार अशावेळी समोर आला आहे जेव्हा टीम इंडिया चॅम्पियन्स ट्रॉफीत चार दिवसानंतर पाकिस्तानसोबत लढणार आहे. प्रशिक्षकाबाबत संभ्रम कायम....
 
- टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदी अनिल कुंबळे यांचेच नाव सर्वात आघाडीवर आहे. कुंबळेंना मुलाखतीसाठी थेट प्रवेश मिळणार आहे. 
- बीसीसीआयचे काही पदाधिकारी कुंबळे हे कोच हवेत म्हणून आग्रही आहेत. कुंबळे यांना प्रशिक्षकपदाची वाढ वर्ल्ड कप 2019 पर्यंत दिली जावी अशी मतांतरे आहेत. तर, विराट कोहली कुंबळेंसमवेत इतके प्रदीर्घ काळ काम करायला तयार नाही.
- कुंबळेंचा कार्यकाळ चॅम्पियंस ट्रॉफीनंतर संपत आहे. आता बीसीसीआय सल्लागार समितीचे सदस्य सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली आणि व्ही व्ही एस लक्ष्मण हे प्रकरण हाताळतील. 
- सल्लागार समिती परत कुंबळेंना संधी देणार की आणखी एखादा नवा प्रशिक्षक टीम इंडियाला मिळणार याबाबत संभ्रम कायम आहे.
 
विराटची सौरव गांगुलीशी चर्चा- 
 
- याप्रकरणी विराटने सल्लागार समितीचे सदस्य सौरव गांगुलीसोबत दीर्घ चर्चा केली आहे. ही चर्चा भारत- न्यूझीलंड सराव सामन्यानंतर झाली.
- विराट आणि त्याची टीम इंडिया माजी प्रशिक्षक रवी शास्त्रीच्या काम करण्याच्या पद्धतीवर खूष होती.
- सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार विराट आणि कुंबळे यांच्यात भारत-ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेदरम्यान मतभेद झाले होते. 
- तेव्हा या दोघांत अंतिम ११ खेळाडू निवडीवरून एकमत होत नव्हते. तेव्हा त्यांच्यात मतभेद झाले होते.
- ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या धर्मशाला कसोटीत कुंबळेंनी चायनामॅन बॉलर कुलदीप यादवला जखमी विराट कोहलीच्या जागी संघात स्थान दिले. त्यावेळी विराटला याबाबत काहीही माहिती नव्हते.
 
सेहवाग- शास्त्रीने नाही भरला अर्ज-
 
- माजी क्रिकेटर वीरेंद्र सेहवागला कोच पदासाठी अर्ज दाखल करण्यास सांगितल्याच्या बातम्या आल्या होत्या. मात्र, सेहवागने यात अजिबात रस दाखवला नाही. सध्या तो लंडन येथे आहे.
- तर, माजी प्रशिक्षक आणि आता समालोचन करत असलेल्या रवी शास्त्रींनी मागे संधी न मिळाल्याने व गांगुलीसोबत वाद झाल्याने रस दाखविला नाही. 
- अशा वेळी माजी ऑस्ट्रेलियन क्रिकेटर टॉम मूडी पुन्हा एकदा रेसमध्ये येऊ शकतात. 
- दुसरीकडे, बीसीसीआयमधील काही लोकांचे म्हणणे आहे की, राहुल द्रविडने सुद्धा प्रशिक्षकपदी अर्ज दाखल करायला हवा. 
- विराट पहिल्यापासून वाटत होते की, रवी शास्त्री हेच टीम इंडियाचे प्रशिक्षक राहावेत, मात्र त्यावेळी विराटच्या मागणीकडे लक्ष दिले गेले नाही.
- कुंबळेंची जून, 2016 मध्ये टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षकपदी निवड झाली होती. 
 
पुढे स्लाईडद्वारे पाहा, अनिल कुंबळेंच्या मार्गदर्शनाखाली गेल्या वर्षभरात क्रिकेटच्या सर्व फॉर्मेटमध्ये कशी कामगिरी राहिली टीम इंडियाची....
बातम्या आणखी आहेत...