आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फोन न उचलल्‍याने इशांत शर्मा दिल्ली रणजी टीममधून बाहेर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज इशांत शर्माला दिल्लीच्‍या रणजी टीममध्‍ये स्‍थान मिळू शकले नाही. बुधवारी जाहीर झालेल्‍या 15 सदस्‍यांच्‍या या संघात इशांतचे नाव नाही. डीडीसीएचे चीफ सिलेक्टर विनय लांबा यांनी या विषयी सांगितले की, 'इशांतने फोन आणि एसएमएसला कोणत्‍याही प्रकारचे उत्‍तर न दिल्‍याने त्‍याला निवडण्‍यात आले नाही. '
असे आहे प्रकरण
बुधवारी यंदाच्‍या रणजी सीजनसाठी दिल्लीची रणजी ट्रॉफी टीम निवडण्‍यात आली. मंगळवारी यासंदर्भात चीफ सिलेक्टर विनय लांबा यांनी इशांतला यासंदर्भात फोन केला होता. त्‍याला संदेशही पाठवण्‍यात आला. मात्र, इशांतने उत्‍तर दिले नाही. इशांतला दिल्‍ली टीममध्‍ये खेळण्‍यासाठी वेळ आहे का, हे विचारण्‍यासाठी त्‍याला चार वेळा फोन करण्‍यात आला होता.
पुढील स्‍लाईड्सवर वाचा, इशांतसमोरील पर्याय आणि कोण - कोण आहे संघात..