आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Indian Pacer Ishant Sharma Mocking Australian Skipper Steve Smith Gives Some LOL Moments During Second Test

इशांत शर्माने अशी केली स्टीव्हन स्मिथची मिमिक्री, पाहा दोघांतील स्लेजिंग मोमेंट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इशांत शर्माने उत्तम अभिनय सादर करताना स्मिथची मिमिक्री केली. - Divya Marathi
इशांत शर्माने उत्तम अभिनय सादर करताना स्मिथची मिमिक्री केली.
स्पोर्ट्स डेस्क- भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बंगळुरू येथील दुसरी कसोटी भारताने मंगळवारी चौथ्या दिवशीच ७५ धावांनी जिंकली. या विजयासोबत भारताने ४ कसोटी सामन्याच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली. असे असले तरी बंगळुरू कसोटीच्या पहिल्या आणि दुस-या दिवशी कांगारूंनी वर्चस्व राखले होते. नॅथन लायनने विणलेल्या फिरकीच्या जाळ्यात भारतीय संघ पहिल्याच दिवशी अडकला व भारताचा डाव अवघ्या १८९ धावांत गुंडाळला. त्यानंतर ऑस्ट्रेलियाने बिनबाद ४० अशी दणक्यात सुरुवात केली. दुस-या दिवशी सकाळच्या सत्रात अखेर भारताला वॉर्नरच्या रूपाने पहिले यश मिळाले. मात्र, त्यानंतरही सलामीवीर मॅट रेनशॉ आणि ऑसी कर्णधार स्टीव्हन स्मिथ मैदानात तळ ठोकून होते.
 
भारताला आणखी विकेटची गरज होती, मात्र कोणत्याही गोलंदाजाला यश मिळत नव्हते. अखेर विराटने इशांत शर्माकडे चेंडू सोपवला. इशांत चांगला स्पेल टाकत होता मात्र त्याला यश मिळत नव्हते. इशांतने आपल्या उसळत्या चेंडूवर व आऊटस्विंगवर रेनशॉसह स्मिथला अनेकदा चकवले पण विकेट मिळत नव्हती. इशांतच्या चेंडूवर अनेकदा चकल्यानंतर स्टीव्ह स्मिथ आपल्या नेहमीच्या शैलीत खांदे हालवत होता व तोंडाने काही हावभाव व्यक्त करत होता. त्याचवेळी इशांतने अगोदर मॅट रेनशॉसारखे हावभाव करत स्लेजिंग करण्याचा प्रयत्न केला जेणेकरून त्याचे मानसिक संतुलन ढळेल व विकेट बहाल करेल पण त्याचाही काही एक परिणाम झाला नाही.
 
सलामीवीर मॅट रेनशॉ बधत नसल्याचे लक्षात आल्यावर इशांतने स्लेजिंगसाठीचा मोर्चा ऑसी कर्णधार स्टीव्हन स्मिथकडे वळविला. स्मिथने एकदा तोंड वाकडे करून चेंडू खेळण्यास कठिण जात असल्याचा हावभाव केला. त्यानंतर पुढच्याच चेंडूवर स्मिथ पुन्हा चकल्यावर इशांतने अभिनयाचा उत्तम नमुना सादर करत स्मिथच्या स्टाईलमध्ये स्लेजिंग केले. त्यावेळी इशांतचे हावभाव पाहण्यासारखेच होते. इतके की भारतीय कर्णधार विराट कोहली व इतर टीममेट स्वत:ला हसण्यापासून रोखू शकले नाहीत. तिकडे स्मिथही खवळला होता. त्याने दुस-याच चेंडूवर इशांतला उत्तर देण्याचा प्रयत्न केला मात्र, इशांतच्या त्या अभिनयापुढे तो तोकडा पडला. या दरम्यान दोघांची चांगलीच जुगलबंदी रंगली. जे कॅमे-यात कैद झाली. इशांत- स्मिथच्या जुगलबंदीचा व्हिडिओ व फोटो टि्वटरवर वायरल झाले. त्याची मनसोक्त मजा नेटीझन्सनी घेतली. काहींनी तर शर्माचा मुलगा बॉलिंगपेक्षा अॅक्टिंग चांगला करतो, अशा तिरकस प्रतिक्रियाही दिल्या. पण इशांतचा स्लेजिंगचा हा नवा प्रकार भारतीय रसिकांना खूपच एन्जॉय केला.
 
पुढे स्लाईडद्वारे पाहा, इशांत शर्माचे कसे होते हावभाव व शेवटच्या स्लाईडवर पाहा, या घटनेचा संपूर्ण व्हिडिओ....
बातम्या आणखी आहेत...