आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Issue About Sachin Tendulkar\'s Son Arjun Tendulkar\'s Selection In Under 16 Cricket Team

कलीयुगातील एकलव्य, 1009 धावा करुनही ऑटोवाल्याच्या मुलाऐवजी सचिनच्या मुलाचे सिलेक्शन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर याची वेस्ट झोन अंडर-16 क्रिकेट संघात निवड झाली आहे. हुबळी येथे होणाऱ्या इंटर झोनल टूर्नामेंटमध्ये हा संघही सहभागी होणार आहे. मात्र या टुर्नामेंटसाठी अर्जुनच्या निवडीपेक्षाही चर्चा आहे ती, प्रणव धनावडेची निवड न झाल्याची. आपल्याला माहितच असेल की, प्रणवने जानेवारी महिन्यात शालेय स्थरावरील एका क्रिकेट सामन्यात 1009 धावांची तुफानी खेळी केली होती.
प्रणवचे वडिल चालवतात ऑटो...
- प्रणव या खेळीमुळे जागतिक पातळीवर प्रसिद्ध झाला होता.
- स्वतः सचिननेच त्याची ऑटोग्राफ असलेली बॅट गिफ्ट केली होती.
- प्रणवसारख्या प्रतिभावान खेळाडूची निवड न झाल्याने सोशल मीडियावरील चर्चा अधिकाधिक वाढत आहे.
- सोशल मीडियावर लोक म्हणत आहे की, वर्ल्ड रेकॉर्ड होल्डर प्रणवला एका स्टार किड अर्जुनने हरवले आहे.
यामुळे अर्जुनच्या निवडिवर प्रश्नचिंन्ह...!
- नॉर्थ झोन विरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात अर्जुन ची गोलंदाजी आणि फलंदाजीतील कामगिरी गचाळ राहिली.
- पहिल्या डावात अर्जुन शून्यावर बोल्ड. तर गोलंदाजी करताना त्याला 12 ओव्हरमध्ये 52 धावा देत एवळ एकच विकेट घेता आली.
- त्याला दुसऱ्या डावातही फारशी चमक दाखवता आली नाही. त्यामुळे त्याच्या निवडीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
- अर्जुनच्या निवडीबाबत प्रश्नचिन्ह लागण्याची ही पहिलीच वेळ नाही.
- 2014मध्ये मुंबईच्या अंडर-14 संघात त्याची निवड झाली होती, त्यावेळीही तो सचिनचा मुलगा असल्याचा त्याला फायदा झाला असल्याचे म्हटले गेले होते.
सहाव्या वर्षापासून मैदानात-
प्रणवचे वडील प्रशांत धनावडे यांनी प्रणवला वयाच्या सहाव्या वर्षापासूनच मैदानात उतरवले. 15 वर्षीय प्रणव आता दहावीत आहे. प्रणवला क्रिकेटपट्टू बनविण्याचे स्वप्न पाहिलेल्या त्याच्या कुटुंबियांना आता त्याला मुंबईकडून खेळताना पाहायचे आहे. इतर क्रिकेटपट्टूप्रमाणेच प्रणवचे देशासाठी खेळण्याचे स्वप्न आहे. यासाठी प्रणव मोठी मेहनत घेत आहे तर त्याचे प्रशिक्षक मोबिन शेख त्याला घडविण्याचे काम करीत आहेत.
MCA ने प्रणवला दिली आहे स्कॉलरशिप
- मुंबई क्रिकेट असोसिएशनने प्रणवला पुढील 5 वर्षांसाठी दर महा 10 हजार रुपयांची स्कॉलरशिप देन्याचा निर्णय घेतला आहे.
- एयर इंडियानेही प्रणवला आपल्या संघात स्थान देण्याचे म्हटेले होते.
- तेव्हा असे वाटत होते की, हजारात एक असलेल्या या खेळाडूला लवकरच घरगुती क्रिकेटमध्ये खेळण्याची संधी मिळेल.
पुढील स्लाइड्सवर पाहा, सोशल मीडियावर अशा येत आहेत कमेंट्स... आणि प्रणवचे काही निवडक Photos...