आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिद्धूने सोडली कपिल शर्माची साथ, 25 कोटी रूपयांवर सोडले पाणी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पंजाबच्या राजकारणासाठी माजी क्रिकेटर नवज्योत सिंग सिद्धू यांनी कॉमेडियन कपिल शर्माची साथ सोडण्याचा निर्णय घेतला आहे. - Divya Marathi
पंजाबच्या राजकारणासाठी माजी क्रिकेटर नवज्योत सिंग सिद्धू यांनी कॉमेडियन कपिल शर्माची साथ सोडण्याचा निर्णय घेतला आहे.
मुंबई- पंजाबच्या राजकारणासाठी माजी क्रिकेटर नवज्योत सिंग सिद्धू यांनी कॉमेडियन कपिल शर्माची साथ सोडण्याचा निर्णय घेतला आहे. तीन वेळा खासदार राहिलेल्या सिद्धूंनी 30 सप्टेंबरपर्यंतच्या सर्व भागांचे शुटिंग संपवले आहे. त्यामुळे आगामी काळात नवज्योत सिंग सिद्धू पंजाबच्या राजकारणात पूर्णपणे लक्ष्य केंद्रित करणार आहेत.
सिद्धू 1 ऑक्टोबर रोजी अमृतसर येथे पोहचत आहेत व त्याच्या स्वागतासाठी जोरदार तयारी सुरु झाली आहे. आपल्याला माहित असेलच की, सिद्धूने आवाज ए पंजाब मोर्चा पक्षाची स्थापना केली आहे. त्याआधी त्यांनी भाजप पक्षाचा सदस्यत्वाचा व खासदारकीचा राजीनामा दिला होता.
असे असले तरी सिद्धूला कपिल शर्माच्या शो मधून वर्षाला 25 कोटी रूपये मिळत होते. एवढ्या मोठ्या रक्कमेवर सिद्धूनी राजकारणासाठी पाणी सोडले आहे. असे असले तरी सिद्धू कोट्यावधी रूपयाचे मालक आहेत. त्याची कमाई टीव्ही शो आणि क्रिकेटमधील कमेंट्रीतून होते. शिवाय पत्नी गेली अनेक वर्षे आमदार आहेत. ते स्वत: अमृतसरमधून दोनदा खासदार म्हणून लोकसभेत गेले आहेत.
पुढे स्लाईडद्वारे पाहा, कोट्याधीश सिद्धूची कमाई किती....

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...